सिरो सर्व्हेत सांगलीत चारशेमध्ये पाच पॉझिटिव्ह...कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प

बलराज पवार
Wednesday, 15 July 2020

सांगली-  भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेतर्फे (आय. सी. एम. आर.) मे महिन्यात करण्यात आलेल्या सीरो सर्वेमध्ये सांगली जिल्ह्यासह राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगलीत घेतलेल्या चारशे व्यक्तींच्या रक्ताच्या नमुन्यात पाच नमुने पॉझिटिव्ह आले होते हे प्रमाण 1.25 टक्के इतके आहे. मात्र कोणत्या भागातील हे पॉझिटीव्ह आहेत ते स्पष्ट झालेले नाही. 

देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये कोरोना संसर्ग होऊन गेला आहे का? त्याचे प्रमाण किती आहे? याची चाचणी घेण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने रॅंडम पद्धतीने देशभरातील 83 जिल्ह्यांमधील लोकांची तपासणी केली होती. त्यात सांगलीसह राज्यातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. या जिल्ह्यातील प्रत्येकी 10 गावांमधील अथवा प्रभागांमधील प्रत्येकी चाळीस असे चारशे जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले. 

देशभरात कोणाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन करून लोकांचा संपर्क कमी करणे, गर्दी टाळणे त्याच बरोबर कंटेनमेंट झोन, बफर झोन आदी माध्यमातून खबरदारीच्या उपाययोजना केल्या होत्या. त्याचा किती लाभ झाला आहे तसेच कोरोनाचा संसर्ग झाला होता की नाही हे चाचण्यांमधून स्पष्ट होणार होते. 
सांगली जिल्ह्यातील नेरले, बागणी, कवठेपिरान, खेराडे वांगी, खरसुंडी आणि आरग ही सहा प्राथमिक आरोग्य केंद्र, आष्टा आणि माडग्याळ ही दोन ग्रामीण आरोग्य केंद्रे यांच्या हद्दीतील प्रत्येकी एक गाव तसेच महापालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक 9 आणि 18 या सर्व ठिकाणाहून प्रत्येकी 40 जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. यातील पाच नमुने पॉझिटिव्ह आले आहेत मात्र ते नेमके कोणत्या आरोग्य केंद्राच्या हद्दीतील आहेत हे अद्याप समितीने कळवलेले नाही. 

सांगली जिल्ह्यातून चारशे जणांचे रक्ताचे नमुने ग्रामपंचायतीने तपासणीसाठी आयसीएमआर पथकाने घेतले होते. यातील पाच नमुने पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. मात्र ते नेमके कुठले आहेत याची माहिती उपलब्ध झालेली नाही. 
डॉ. सुजाता जोशी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, सांगली. 

संपादन : घनशाम नवाथे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five positive in four hundred in Sangli in Siro survey