पी.एन.जी.कडून पाच हजार एन 95 मास्क 

SGI20A12325.jpg
SGI20A12325.jpg

सांगली,  : कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टर, नर्सेस, ब्रदर तसेच वॉर्डबॉय यांनाही सुरक्षितता बाळगणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी त्यांनी विशेष मास्क वापरण्याची आवश्‍यकता असते. मात्र अशा एन 95 मास्कची टंचाई आहे. त्यामुळे डॉक्‍टरांना हे मास्क पुरवण्याची जबाबदारी प्रशासनाची होते.

पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्स यांच्याकडून पाच हजार एन 95 मास्क जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले.सांगली अर्बन बॅंकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, आमदार सुधीर गाडगीळ यांनी हे मास्क जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे सुपुर्द केले. 
मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन करण्यात आल्यावर सामान्य नागरिकांनीही एन 95 मास्कची बाजारातून मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे या मास्कची टंचाई निर्माण झाली आहे.

पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्सकडून मिळालेले मास्क जिल्हा प्रशासनाच्या कोरोना नियंत्रण कक्षाचे प्रमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्याकडून सुपूर्द करण्यात येणार आहेत. यावेळी पी. एन. जी.चे संचालक समीर गाडगीळ, तेजस गाडगीळ उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी या अडचणीच्या काळात मदत केल्याबद्दल पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्सचे आभार मानले. तसेच जिल्ह्यातील दानशूर व्यक्तीनी कोरोना विरुध्दच्या या लढ्यात जिल्हा प्रशासनास सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com