पाच वर्षांची चिमुरडी कृष्णेत गेली वाहून, कुठे घडला प्रकार?

Five-year-old girl went to Krishna river
Five-year-old girl went to Krishna river

इस्लामपूर : बहे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील रामलिंग बेट परिसरात कृष्णा नदीच्या पात्रात पडून येथील जैनशा भावर पोरवाल ही 5 वर्षांची चिमुरडी पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली. ही घटना आज बुधवारी दुपारी (ता.24) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. घटना लक्षात येण्याच्या आत मुलगी वाहून गेली होती. उपस्थित महिलांनी आरडाओरडा केला, परंतु उपयोग झाला नाही. दिवसभर तिचा नदीपात्रात शोध उशिरापर्यंत सुरू होता. 

जैनशा ही येथील शालीमार कापड दुकानाचे मालक भावर पोरवाल यांची ती कन्या आहे. ती आपली आई व इतर महिलांसमवेत आज बहे रामलिंग बेटावर फिरण्याठी गेली होती. दुपारी नदीपात्रात ती खडकावर खेळत बसली होती. बाजूलाच महिला एकमेकांशी बोलण्यात व्यस्त होत्या. कुणाचेही लक्ष नसताना ही मुलगी पाणी पात्रात गेली. तिचा पाय घसरल्याने ती नदीच्या पात्रात पडली.

पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती प्रवाहासोबत वाहून गेली. घटना लक्षात येताच तिच्या आईने व उपस्थित महिलांनी आरडाओरडा केला; परंतु त्यावेळी त्या परिसरात कोणीच नसल्याने कुणाचीही मदत मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने तिचा शोध सुरू केला. एक अधिकारी, पाच पोलीस आणि स्थानिक रहिवाशी,

ग्रामस्थांनी शोध मोहीम राबवली, मात्र तिचा शोध लागला नव्हता. खरातवाडी गावाजवळ तिची बॅग सापडली. रात्री उशिरापर्यंत घटनेची पोलिसात नोंद नव्हती. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोध सुरूच ठेवला होता.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com