पंढरपुरात टांगेवाल्या काकांच्या हस्ते झेंडावंदन 

अभय जोशी 
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

पंढरपूर : पंढरपूर शहरातील प्रसिध्द आदर्श प्राथमिक विद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षणा बरोबरच अनेक उपक्रम राबवले जात असतात. आज भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने गेली 55 वर्षे शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना आपल्या टांग्यातून अतिशय जिव्हाळ्याने ने -आण करणाऱ्या शाळेच्या निष्ठावंत असे टांगेवाले काका "नजीर नबीलाल हकीम" यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या "नजीर" चाचा ना झेंडावंदनाची संधी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आल्याने त्यांनी ऋण व्यक्त केले. 

शाळेच्या विद्यार्थ्यांना गेल्या 57 वर्षांपासून आपुलकीने व जिव्हाळ्याने "नजीर हकीम" हे त्यांच्या टांग्यातून सुखरुन ने आण करत असून त्यांची ही बालसेवा अविश्रांत सुरु आहे. अनेक वर्षे शाळेच्या चिमुरड्यांशी एकरुप झालेल्या नजीर चाचांनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडली आहे परंतु आजही त्यांचा उत्साह कायम आहे. म्हातारपणाच्या छटा त्यांच्या चेहऱ्यावर बिलकूल दिसत नाहीत. "बालसेवा हिच इश्‍वरसेवा" मानून नजीर चाचा वर्षानुवर्षे हे काम निष्ठेने करत असल्याकडे शाळेचे माजी विद्यार्थी मंदार केसकर यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून लक्ष वेधले होते. 

"नजीर चाचा" शाळेतील चिमुरड्या मुलामुलींना आपल्या टांग्यातून शाळेत नेण्याचे आणि पुन्हा घरी पोचवण्याचे काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या व्यवसायात ते अतिशय आनंदी आणि समाधानी आहेत. पंढरपूर मधील हजारो विद्यार्थ्यांनी त्याच्या टांग्यातून शाळेत जा - ये केल्याने सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये ते नजीर " या नावानेच प्रसिध्द आहेत. 

आज "नजीर हकीम" यांच्या हस्ते झेंडावंदन करावे अशी सूचना संस्थेचे प्रमुख सुधाकरपंत परिचारक यांनी केली होती. त्यानुसार आज शाळेत त्यांच्या हस्ते झेंडावंदन कार्यक्रम झाला. श्री.परिचारक यांच्या हस्ते "नजीर चाचा" चा सत्कार करुन गौरव करण्यात आला. पांडुरंग ट्रॅव्हल्सच्या कवडे बंधूंनी त्यांच्या आईच्या सन्मानार्थ ग्रंथतुला करुन शाळेच्या वाचनालयास पुस्तके भेट दिल्याबद्दल सौ.उंबरकर यांच्या हस्ते कवडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव सतीश पुरंदरे, प्रतिभा कुलकर्णी, रेखाताई उंबरकर, डॉ.अनिल जोशी, ऍड.ज्ञानेश आराध्ये आणि मंदार केसकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका राजश्री घंटी यांनी केले. सूत्रसंचलन मैत्रयी केसकर व सौ.कोळी यांनी केले. शाळेच्या टांगेवाले काकांना झेंडावंदनाची संधी दिल्याने आणि त्यांच्याच हस्ते आज शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केल्याने चिमुरडे हरखून गेले होते. 

Web Title: flag hosting in Pandharpur