चंदगड नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा

Flag of Maha Vikas Alliance On Chandgad Nagar Panchayat
Flag of Maha Vikas Alliance On Chandgad Nagar Panchayat

चंदगड ( कोल्हापूर ) - येथील नगरपंचायत स्थापनेनंतरच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीने नगराध्यक्षपदासह दहा जागा जिंकत झेंडा रोवला. विरोधी भाजप आघाडीला पाच, अप्पी पाटील गटाला दोन तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला. निवडणुक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांनी निकाल जाहिर करताच विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी फटाक्‍यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केला. 

नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या प्राची काणेकर यांनी भाजपच्या समृध्दी काणेकर यांच्यापेक्षा 876 मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. लहान प्रभाग आणि मतदारांच्या तुलनेत उमेदवारांची वाढलेली संख्या यामुळे एक मतापासून सात मतांची आघाडी घेतलेला उमेदवार विजयी ठरला. प्रभाग 10 मध्ये भाजपच्या सरीता हळदणकर यांना 171 मते मिळाली त्यांच्यापेक्षा केवळ एका मताची आघाडी घेऊन महाविकास आघाडीच्या अनिता परीट विजयी ठरल्या. हळदणकर यांनी निकाल जाहिर झाल्यानंतर फेर मतमोजणीची मागणी केली. परंतु निकाल जाहिर करण्यापूर्वी हरकत घेतली न गेल्याने त्यांची मागणी फेटाळण्यात आली. प्रभाग 11 मध्ये महाविकास आघाडीचे अरुण पिळणकर यांना 133 मते मिळाली. त्यांचे विरोधी भाजपचे सचिन नेसरीकर यांनी 140 मते मिळवली. 7 मतांनी नेसरीकर विजयी ठरले. काही उमेदवारांना पडलेली एकूण मतेही एकेरी संख्येत होती. काहींना केवळ आपल्या कुुटुबातीलच मते घेता आली असेही दिसून आले. 

अर्ध्या तासात सर्व निकाल उघड

येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात झाली. पहिली फेरी 9 टेबलवर तर दुसरी फेरी 8 टेबलवर पार पडली. अवघ्या अर्धा तासात सर्व निकाल उघड झाला. निकालाला वेळ लागणार या अंदाजामुळे मतमोजणी केंद्राच्या बाहेर म्हणावे तसे समर्थक जमले नव्हते. त्यामुळे अत्यंत शांततेत मतमोजणी प्रक्रीया पार पडली. निकालानंतर विजयी उमेदवारांना प्रांताधिकारी श्री. खिलारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. नगराध्यक्षपदी निवड झालेल्या उमेदवार प्राची काणेकर यांनी आमदार राजेश पाटील, पती दयानंद काणेकर, शिवानंद हुंबरवाडी आदींच्या उपस्थितीत प्रमाणपत्र स्विकारले. त्यानंतर समर्थकांसह शहरातून फेरी काढून मतदारांना अभिवादन केले. नगरसेवकपदी निवडून आलेल्या उमेदवारांनीही आपापल्या प्रभागातून फेरी काढून मतदारांचे आभार मानले. 

प्रभाग निहाय विजयी उमेदवार आणि त्यांना पडलेली मते

नगराध्यक्ष- प्राची काणेकर 3494, नगरसेवक- अभिजित गुरबे 240, दिलीप चंदगडकर 88, मुमताजबी मदार 131, नूरजहॉं नाईकवाडी 158, मेहताब नाईक 254, झाकीरहुसेन नाईक 180, नेत्रदीपा कांबळे 231, आनंद हळदणकर 155, अनुसया दाणी 129, अनिता परीट 172, सचिन नेसरीकर 140, फिरोज मुल्ला 250, माधुरी कुंभार 167, रोहीत वाटंगी 196, संजीवनी चंदगडकर 199, प्रमिला गावडे 266, संजना कोकरेकर 178. 
 

प्रभाग निहाय पराभूत उमेदवार व मिळालेली मते  

नगराध्यक्षपदासाठी- समृध्दी काणेकर 2618, शुभांगी चौगुले 84, वैष्णवी हळदणकर 161.

नगरसेवक- प्रभाग 1- प्रदीप कडते 71, अजय कदम 70. प्रभाग 2- राजीव चंदगडकर 36, चंद्रकांत दाणी 7, शंकर देशमुख 22, जावेद नाईक 46, खालीद पटेल 0, जहांगीर पटेल 8, सुधीर पिळणकर 41, विक्रम मुतकेकर 74, चेतन शेरेगार 38. प्रभाग 3- शहीदा नेसरीकर 122, फिरदोस मदार 68. प्रभाग 4- शगुफ्ता फणीबंद 100. प्रभाग 5- अब्दुलसत्तार नाईक 4, सिकंदर नाईक 150, सुहेल नाईक 27, सलाउद्दीन नाईकवाडी 21, इस्माईल मदार 16, महमदशफी मुल्ला 7. प्रभाग 6- नविद अत्तार 144, अल्ताफ मदार 73, इस्माईल शहा 76. प्रभाग 7-विद्या कांबळे 98. प्रभाग 8- सचिन पिळणकर 64, संतोष वणकुंद्रे 95. प्रभाग 9- लक्ष्मी गायकवाड 21, अक्षता निट्टूरकर 117, जयश्री फाटक 62. प्रभाग 10- सोनिया रजपूत 51, सरीता हळदणकर 171. प्रभाग 11- गजानन पिळणकर 133. प्रभाग 12- अब्दुलसत्तार मुल्ला 77, गफार शेरखान 167. प्रभाग 13- सुचिता कुंभार 159. प्रभाग 14- गोविंद गुरव 86, विनायक पाटील 132. प्रभाग 15- सुजाता सातवणेकर 158, उज्वला सुतार 65. प्रभाग 16- संजीवनी देसाई 165. प्रभाग 17- सुवर्णा गुळामकर 75, माधुरी पवार 100. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com