कऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा 

flex
flex

कऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व नियंत्रणाबाहेर लागणारे फ्लेक्स शहाराच्या सौंदर्यास बाधा ठरत आहेत. असे असेल तर शहरात सरसकट फ्लेक्स बंदी करावी, अशा मागणी ज्येष्ठ नगरसेवक नगरसेवक विनायक पावसकर यांनी आझ पालिकेच्या विशेष सभेत केली.

नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे अद्यक्षस्थानी होत्या. यावेळी जनशक्तीच्याही नगरसेवकांनी त्या मागणीस पाठिंबा दिला. त्यामुळे पालिकेच्या येणाऱ्या मासिक बैठकती शहरात सरसकट फ्लेक्स बंदीचा ठराव होण्याची शक्यात व्यक्त होत आहे. याच बैठकीत शहराला फाईव्ह स्टारचे मानांकान मिळावे, असा इरादा पालिकेने घोषीत केल्याचा ठरावही एकमताने मंजूर झाला. त्याबरोबर थ्री स्टारच्या मानांकनाची तयारी पूर्ण झाल्याचेही जाहीर केले. 

स्वच्छ सर्व्हेक्शातंर्गत शहरात फाईव्ह स्टार मानांकनांसाठी पालिकेने इरादा गोषीत केला. त्याचा ठराव पालिकेच्या मासिक बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानिमित्ताने जी काही कामे हाती घ्यायची आहे. त्या कामांनाही मंजूरी देण्यात आली. त्याचवेळी फ्लेक्सचा मुद्दा ज्येष्ठ नेगरसेवक श्री. पावसकर यांनी उचलून धरला. पालिकेत येताना किंवा शहरातून फिरताना किती जमाना बघायेच, असे मार्मिक प्रश्न विचारत श्री. पावसकर यांनी फ्लेक्स बहाद्दरांवर हल्लाक केला. ते म्हणाले, पालिकेत येताना किंवा शहरातून फिराताना नको त्या लोकांचे चेहरे बघत फिरावे लागलेत आहे. कोणी बाबा, दादा, काका, मामा, अण्णा, सावकर, सरकार तर अनेक टिकाणी भाईचे फ्लेक्स लागलेले दिसता.च त्यामुळे शहरात फ्लेक्सचेच राज्य आहे, असी स्थिती आहे. पालिकेच्या बाहेरील परिसरातही मध्यंतरी मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लागले होते.

त्यामुळे फ्लेक्स म्हणजे शहराच्या विद्रुपीकरण वाढवणारे ठरत आहेत. ते बंद व्हावेत, यासाठी शहरात सरसकट बंधी आणली पाहिजे. तसा ठराव येणाऱ्या पालिकेच्या मासिक बैठकीत घ्यावा. ८ी. पावसकर यांनी मांडलेल्या ठरावाला तत्काळ नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी पाठिंबा दिला. उपाध्यक्ष जयंवत पाटील यांनाही मुद्दा बरोबर आहे, असे मांडले. त्यामुळे पालिकेच्या येणाऱ्या मासिक बैठकीत शहरात सरसकट फ्लेक्स बंदी होण्याची शक्यात दाट झाली आहे. शहरात स्वच्छ सर्व्हेक्शनातंर्गत 2019 मद्ये फाईव्ह स्टार मानांकनासाठी पालिकेने इरादा घोषीत केला. त्यासाठीचा ठराव एकमताने मंजूर झाला. त्या अनुशंगाने शहरात ग्यायवयाची कामे व त्यासाठी लागणाऱ्या प्रशासकीय पातलीवरील कामांनाही मंजूरी देण्याचा ठराव एकमताने झाला. त्यात स्वच्छतेच्या संदेश देवून भिंती रंगविणे, शौचालयास येणाऱ्या फिडबॅक यंत्र बसविणे, काही ठिकाणी शौचालय बांधणे, घरगुती कचरा बकेट करेदी करणे आदीसह विविद विषयास मंजूरी देण्यात आली. त्याचवेळी हागणदारी मुक्त शहरचा इरादाही पालिकेने घोषीत केला. त्यावर हरकती मागविण्यात येमार आहेत. त्यानुसार पुडील निर्णय होणार आहे, असे त्या ठराव म्हटले आहे. 

काम करणाऱ्यांचा 25 नोव्हेंबरला सत्कार 
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिती 25 नोव्हेंबरला आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथील त्यांच्या समाधीस्थळी अभिवादनासा येमार आहेत. त्यावेळी स्वच्छ सर्व्हेक्षणात काम करणाऱ्या सफाई कर्मचारी, वाहन चालक, कचरा वेचणाऱ्या महिला यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्व्हेक्शनाच्या 2019 च्या जिंगल व्हिडीओ सिडीचे प्रकाशही त्यांच्याहस्ते करण्याचे नियोजन आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com