Vidhan Sabha 2019 : रोहित पवारांच्या विजयोत्सवाचे फ्लेक्स झळकले! (Video)

टीम ई-सकाळ
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

या अगोदर खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार सचिन दोडके आणि महायुतीचे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील उमेदवार सुनील कांबळे यांच्या विजयोत्सवाचे फ्लेक्स झळकले आहेत. 

कर्जत : विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल गुरुवारी (ता.24) जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्वच राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्त्यांचे लक्ष्य त्याकडे लागले आहे. मतमोजणीला अवघे काही तास उरले असताना काही ठिकाणी आपलाच उमेदवार निवडून येणार या उत्साहात कार्यकर्त्यांनी फ्लेक्स उभारले आहेत.  
 
राज्यातील लक्ष्यवेधी लढतींपैकी एक असणाऱ्या कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदा चुरस पाहायला मिळाली. महाआघाडीचे युवानेते रोहित पवार आणि भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. मात्र, उद्या निकाल लागण्याअगोदरच रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र फ्लेक्स उभारण्यास सुरवात केली आहे.

- पुणे : 'या' मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना जिंकण्याचा विश्वास; फ्लेक्सबोर्ड छापून तयार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नातू रोहित पवार यांच्या प्रचारार्थ कर्जतमध्ये सभा घेतली होती. यावेळी त्यांनी 24 तारखेला कर्जत-जामखेडमध्ये भाजपचा राम शिल्लक राहणार नाही, हा मथळा मीडियामध्ये सर्वत्र झळकेल, असे वक्तव्य केले होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी जामखेडमध्ये घेतलेल्या जाहीर सभेची चर्चा सर्वत्र झाली. भर दुपारी झालेल्या या सभेवेळी मुंडे आणि पवार दोघेही उन्हातच बसले होते. 

- शॉर्टफिल्ममधून व्यक्त होतेय तरुणाई; 'या' जिल्ह्यात वर्षभरात बनताहेत 50 शॉर्टफिल्म्स!

तरुणांमध्ये असणारी क्रेझ, फ्रेश चेहरा आणि सर्वसमावेशक नेतृत्व अशी रोहित पवार यांनी आपली स्वत:ची ओळख काही महिन्यांतच बनविली आहे. कोणतेही पद नसताना कर्जतमध्ये आतापर्यंत त्यांनी केलेली कामे हा या निकालाचा कळीचा मुद्दा ठरणार आहे. 

- Vidhan Sabha 2019 : मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण; 10 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

या अगोदर खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार सचिन दोडके आणि महायुतीचे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील उमेदवार सुनील कांबळे यांच्या विजयोत्सवाचे फ्लेक्स झळकले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flex of NCP leader Rohit Pawars victory in the Vidhan Sabha elections 2019 are displaying in Karjat