संतप्त पूरग्रस्त नागरिकांनी सांगलीत रोखला बायपास रस्ता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

सांगली - येथील बायपास रस्त्यावरील शिवशंभू चौकात आज दुपारी दिडच्या सुमारास संतप्त पूरग्रस्त नागरिकांनी किमान प्राथमिक सुविधांसाठी रस्ता रोखून धरला. कर्नाळ रस्त्यावरील गोवर्धन चौक परिसरातील सुमारे साठ कुटुंबे ओतभागात राहतात. तेथे पूरग्रस्तांसाठीच्या कोणत्याच नागरी सुविधा पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिक आक्रमक झाले. पोलिस व अधिकाऱ्यांनी धाव घेत समजून काढत आंदोलन मागे घेण्यासाठी नागरिकांना विनंती केली. 

या भागात रस्ते नाहीतच मात्र तात्पुरता मुरुम टाकावा. पाण्यात सतत वावरल्याने सतत चिखलात राहून पायांना जखमा होत आहेत. पंचनामे नाहीत की सानुग्रह अनुदानाची रक्कम अद्याप पोहचलेली नाही. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी आज रस्ता रोखून धरला. आकाश मोहिते, पंकज भोसले, गणेश सरगर, प्रशांत सरगर, नवनाथ माळी यांनी पुढाकार घेत आंदोलन सुरु करताना आजुबाजूच्या नागरिकांचीही त्यांना साथ मिळाली. त्यानंतर अधिकारी धावले. त्यांनी नागरिकांची समजूत घालत सायंकाळपर्यंत सुविधा द्यायची हमी दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

श्री मोहिते म्हणाले,"" आम्ही रोज ओरड करून सांगतोय मात्र कोणीही फिरकायला तयार नाही. सुविधा न मिळाल्यास उद्या आम्ही पुन्हा आंदोलन करु.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood affected area citizens agitation blocked bypass road in Sangli