
यंदाच्या महापुराच्या थैमानानं कोल्हापूरला जीवघेणा विळखा घातला. पूरग्रस्तांना मदतकार्य सुरू झाले. मदतीचे हजारो हात पुढे सरसावले. पण, ही मदत योग्य ठिकाणी पोचावी, याच्या नियोजनासाठी म्हणून चाळीसहून अधिक संस्था, संघटना मिळून कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ‘केडीएम’ या फोरमची स्थापना झाली.
कोल्हापूर - यंदाच्या महापुराच्या थैमानानं कोल्हापूरला जीवघेणा विळखा घातला. पूरग्रस्तांना मदतकार्य सुरू झाले. मदतीचे हजारो हात पुढे सरसावले. पण, ही मदत योग्य ठिकाणी पोचावी, याच्या नियोजनासाठी म्हणून चाळीसहून अधिक संस्था, संघटना मिळून कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ‘केडीएम’ या फोरमची स्थापना झाली.
‘केडीएम’च्या माध्यमातून आर्मी रेस्क्यू असिस्टन्स, डिस्ट्रीब्युशन अँड सप्लाय, आयटी-कम्युनिकेशन, शेल्टर मॅनेजमेंट, हाऊस कीपिंग अँड क्लिनिंग, वुमेन अँड चाईल्डकेअर, मेडिकल केअर, ट्रान्स्पोर्टेशन, फ्युएल अँड व्हेइकल टोईंग, कलेक्शन ऑफ मटेरियल्स, व्हॉलेंटीअर रजिस्ट्रेशन, इंजिनिअरिंग अँड रिपेअर्स अशा विविध समित्या कार्यरत झाल्या.
‘सकाळ’चे पाठबळ
पूरगस्तांना मदतीसाठी सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले व त्यानंतर साहित्यांची मदतही जमा होऊ लागली. ही मदत ‘सकाळ’ने पोचवलीच. त्याशिवाय ‘केडीएम’च्या माध्यमातूनही पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. ‘केडीएम’च्या आपत्कालीन कामाला ‘सकाळ’ने पाठबळ दिले आहे.