हवाईसेवेमुळे मदतकार्यात वेग

निवास चौगले
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

हवाईदलाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक
सकाळी सात वाजल्यापासून वायुसेनेचे प्रमुख ए. श्रीधर, कोल्हापूरचे सुपुत्र संदीप पोवार, विंग कमांडर कृष्णन, महिला पायलट पारूल, एस. के. गुप्ता व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मोहिमेत झोकून काम केले. आवश्‍यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवून, तर ज्या ठिकाणी हे शक्‍य नाही त्या ठिकाणी बकेटच्या साहाय्याने या बहाद्दर जवानांनी साहित्य पोचवले. त्यांना लष्कराच्या जवानांबरोबरच पोलिस दलाच्या जवानांनी मदत केली.

कोल्हापूर - साहित्याचे वजन करणे, वर्गवारी करणे, हेलिकॉप्टरमध्ये साहित्य भरून देणे अशी धांदल आज कोल्हापूर विमानतळावर बघायला मिळाली. शिरोळ तालुक्‍यातील पुराने वेढलेल्या गावांना जाणारे बहुंताशी मार्ग बंद आहेत, त्यामुळे हवाईदलाच्या हेलिकॉप्टरमधूनच हे साहित्य पाठवण्यात आले.

शिरोळ तालुक्‍यातील कुरुंदवाड, नृसिंहवाडी, आलास, बुबनाळ, खिद्रापूर, टाकळी, टाकळीवाडी, बस्तवडे, राजापूर अशा अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे. या गावांतील लोकांना दत्त-शिरोळ कारखाना, गुरुदत्त शुगर्स-टाकळीवाडीसह काही शाळा व महाविद्यालयांच्या आवारात ठेवण्यात आले आहे. अशा दहा ते बारा ठिकाणी लोकांच्या छावण्या तयार करण्यात आल्या आहेत. या गावांतील घरे तर पाण्याखाली आहेतच; पण काही विकत घ्यावे तर दुकानेही पाण्याखाली आहेत. त्यामुळे टूथपेस्ट, ब्रश, वैद्यकीय साहित्य, सॅनिटरी नॅपकिन, लहान मुलांसाठी दूध, ब्रेड, बिस्कीट, फरसाण  यांसारख्या खाद्यपदार्थांपासून ते जेवणाचे साहित्यही या लोकांना पाठवण्याची गरज होती. आज विमानतळावर गोळा झालेले असे साहित्य वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे शिरोळ तालुक्‍यात पोचवले. हेलिकॉप्टरच्या सहा खेपांतून साडेआठ टन खाद्यपदार्थ पाठवले. 

मुलाला हेलिकॉप्टरने हलविले
पालकमंत्री पाटील कुरुंदवाड येथे गेले असताना या गावातील राजीव सक्‍सेना हा चार वर्षांचा मुलगा तापाने फणफणत असल्याचे लोकांनी सांगितले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्‍यक असल्याचे स्थानिक डॉक्‍टरांनी सांगितल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी स्वतः गेलेल्या हेलिकॉप्टरमधून आणले. तेथून त्याला रुग्णवाहिकेतून कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नगर
    धरणाच्या ११ दरवाजांतून ५ हजार क्‍युसेकने पाणी सोडले
    भंडारदरा, निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच

मराठवाडा
    जायकवाडीची पातळी ८२ टक्‍क्‍यांवर
    कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा तिसरा प्रयोगही अयशस्वी
    परभणीत १७ मंडळांत ३० टक्‍क्‍यांच्या आत पाऊस

खानदेश
    धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पूरस्थिती ओसरली.
    जळगाव जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर धरणाची पातळी वाढली

विदर्भ
    भामरागडची पूरस्थिती निवळली
    विदर्भात मंगळवारपासून पुन्हा मुसळधारेची शक्‍यता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Helicopter Service Help