पुणे-बंगळूर महामार्गावर यमगर्णीजवळ पाणी पातळीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

निपाणी - परिसरातील मुसळधार पावसामुळे आणि राधानगरी कोयना, पाटगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निपाणी तालुक्यातील वेदगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बुधवारी निपाणीतील राष्ट्रीय महामार्गावर चार फूट पाणी वाहत होते. आज महामार्गावर वाहणाऱ्या पाण्यात दोन फुटांनी वाढ झाली आहे. 

पुराच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने महामार्गसह पुरग्रस्त गावांना रेड अलर्ट दाखविण्यात आला आहे. परिणामी पाण्याबरोबरच पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे. 
गेल्या तीन दिवसापासून कोल्हापूर, निपाणी मार्गावरील यमगर्णी येथील महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अतिदक्षतेचा इशारा पोलीस तसेच महसूल खात्याने दिल्याने नागरिकास वाहनधारकांना ये - जा करण्यास बंदी घातली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood in Nipani taluka is dangerous