शिरोली पुलाची येथील पुणे बंगळूर महामार्गाच्या सेवामार्गावर पाणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

येथील पुणे बंगळूर महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवामार्गावर पाणी आले असून, शिरोलीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या सेवामार्गावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक नागाव फाटा मार्गे महामार्गावर वळवली आहे.

शिरोली पुलाची - येथील पुणे बंगळूर महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवामार्गावर पाणी आले असून, शिरोलीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या सेवामार्गावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक नागाव फाटा मार्गे महामार्गावर वळवली आहे. 

संततधार पावसामुळे पंचगंगा पूलापासून शिरोलीतील सेवामार्गावरील शेतकरी संघाचा पेट्रोल पंप व हॉटेल जय हिंद दरम्यान पाणी आले होते. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक  पोलीस प्रशासनाने बंद केली आहे. तसेच शिरोलीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या सेवामार्गावर काल पाणी आले होते. आज सकाळी पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने, आज सकाळी पोलीसांनी वाहतूक बंद केली. 

कोरगावकर पेट्रोल पंपासमोर बॅरेक्टस टाकून वाहतूक बंद केली. तरीही काही मोटरसायकल बाजूने रस्ता काढून, पूराच्या पाण्यातून धोकादायक प्रवास करत होते. सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक सांगली फाट्याकडून नागाव फाटा मार्गे महामार्गावर वळवली होती. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Rain Water Pune Bangalore Highway Shiroli Pulachi