सांगली - कोल्हापूरचा महापूर मानवनिर्मित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

सांगली - सांगली - कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात आलेला महापूर हा निसर्गनिमिॅत नसून मानवनिर्मित आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सरकार याला जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी
इतिहासतज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

सांगली - सांगली - कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात आलेला महापूर हा निसर्गनिमिॅत नसून मानवनिर्मित आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सरकार याला जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी
इतिहासतज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

श्री. कोकाटे म्हणाले, ""दोन जिल्ह्यातील महापुराने माणसे, जनावरे, घरे, शेती, व्यवसाय यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केवळ दोन जिल्ह्यावरचे संकट नसून देशावरचे संकट आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी. तरच सर्वांना मदत मिळू शकेल. किल्लारी भुकंपानंतर सर्वांना घरे बांधून देऊन स्वतंत्र गाव वसवले, त्याप्रमाणे शासनाने पूरग्रस्तांना पक्की घरे बांधून द्यावीत. ऊस, सोयाबीन, पिके नष्ट झालेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शंभर टक्के भरपाई मिळावी. विमा कंपन्यांनी पूरग्रस्त भागातील प्रकरणे विनाविलंब मंजूर करावीत. तसेच इतरांना शासनाने भरपाई द्यावी. जिवीत हानी झालेल्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी द्यावी. शहरी व ग्रामीण भेदभाव न करता सरसकट मदत करावी.''

श्री. कोकाटे पुढे म्हणाले, "" पुन्हा भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही राज्यातील अभियंत्यांची संयुक्त
समिती स्थापन करावी. पावसाळ्यात तीन महिन्यात या समितीने पाण्याच्या विसर्गाबाबत नियोजन करावे. पूरस्थिती आल्यास समितीला जबाबदार धरावे. तसेच कृष्णेचे अतिरिक्त पाणी कराड येथून उचलून दुष्काळी भागाला द्यावे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होणार नाही. तसेच सांगली - कोल्हापूरमध्ये
एनडीआरएफचे युनिट कार्यरत ठेवावे.''

डॉ. संजय पाटील, हर्षवर्धन मगदूम, अमोल सूर्यवंशी, योगेश पाटील, राहुल पाटील, संभाजी पोळ, शेखर परब, सोमनाथ गोडसे आदी उपस्थित होते.

मोदींना पूरग्रस्तांचे दु:ख नाही 
अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले. कलाकार आणि इतरांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलेच पाहिजे. परंतू सांगली - कोल्हापुरात महापूर येऊन काहींचा बळी गेला तरी अद्याप मोदींनी पूरग्रस्तांच्या दु:खामध्ये सहभागी व्हावे असे वाटले नाही. श्रीदेवी एवढी पूरग्रस्तांना किंमत नाही काय? असा सवाल श्री. कोकाटे यांनी केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood in Sangli - Kolhapur is artificial Srimant Kokate comment