सांगलीत पुन्हा पूरसदृश परिस्थिती; नागरिकांचे स्थलांतर सुरु

FLood in Sangli Migration of citizens
FLood in Sangli Migration of citizens

सांगली : गेले दोन - तीन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीतील पाण्याची पातळी वाढत आहे. नदीकाठावरील सूर्यवंशी प्लॉटमध्ये नाल्यातील बॅक वॉटरचे पाणी शिरले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. सांगलीतील आटपाडा येथेही आवळाई ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेला. 

सूर्यवंशी प्लॉटमध्ये महापालिका प्रशासनाने माईकवरुन पुकारा करुन नागरिकांना स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकीकडे मतदानाची धावपळ उडाली असताना सूर्यवंशी प्लॉटमध्ये नागरिकांवर स्थलांतराची वेळ आली आहे.

काल दिवसभर पाऊस पडल्यामुळे आनेक गावचे पुल पाण्याखाली गेले आहेत तरीही उत्साही मतदारानी पाण्यातून वाट काढत मतदानाचा हक्क बजावला आहे. आवळाई ओढयावरील पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच शेटफळे येथील दोन्ही पूल पाण्याखाली गेले आहेत. माळेवाडी येथीलही पूलावरून पाणी वाहू लागले आहे. हे पुल गाव आणी वाडया-वस्त्यांना जोडणारे आहेत.

आज मतदान असल्यामुळे पावसामुळे अडचण निर्माण झाली होती. आवळाई, शेटफळे आणी माळेवाडी येथे कार्यकर्त्यांनी वस्तीवरील मतदारांना पूलावरील पाण्यातून मार्ग काढत मतदानासाठी आणले होते. वयोवृध्दानाही विशेष दक्षता घेऊन आणले जात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com