कोल्हापुरात पुरामुळे 'हे' रस्ते बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 154.50 मिलीमिटर तर गडहिंग्लज तालुक्यात सर्वात कमी 13.43 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. पण जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने अनेक भागात पुरस्थिती आहे. विविध मार्गावर पाणी आल्याने रस्ते बंद आहेत. जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोल्हापूर - जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 154.50 मिलीमिटर तर गडहिंग्लज तालुक्यात सर्वात कमी 13.43 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. पण जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने अनेक भागात पुरस्थिती आहे. विविध मार्गावर पाणी आल्याने रस्ते बंद आहेत. रत्नागिरी मार्गावर पाणी आल्याने कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग बंद आहे. 

वडणगे मार्गावर पाणी

कोल्हापूर वडणगे मार्गावरील पोवार पाणंद येथे पुराचे पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. लोंघे जवळ पाणी वाढत असून सद्यस्थितीला 50 टक्के रस्त्यावर पाणी आले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहील्यास कोल्हापूर ते गगनबावडा या मुख्य रस्त्याची वाहतूक पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे.

कसबा बावडा - शिये रस्ता बंद

रुई येथील बंधाऱ्यावर ७० फुटापर्यंत पाणी आहे. नदी काठावरील गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कसबा बावडा ते शिये या मार्ग मार्ग दोन्ही बाजूने वाहतूक बंद केली आहे.  

चिंचवाडसाठी वाहतूक मुडशिंगीमार्गे सुरू

दुपारी दीडच्या सुमारास चिंचवाड रस्त्यावर पाणी आल्याने चिंचवाड फाट्याच्या पुढे हा रस्ता बंद केला आहे. चिंचवाडसाठी मुडशिंगी मार्गे वाहतूक सुरू आहे. 

जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्याखाली

जिल्ह्यातील विविध नद्यावरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोणत्या नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत याची सविस्तर माहिती...

पंचगंगा नदीवरील - शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. 
भोगावती नदीवरील - हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे. 
कासारी नदीवरील - बाजारभोगाव, वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, यवलूज, कांटे, करंजफेन व पेंडाखळे. 
तुळशी नदीवरील - बीड, आरे व बाचणी. 
वारणा नदीवरील - चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. 
कडवी नदीवरील - सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. 
दुधगंगा नदीवरील - दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड व बाचणी. 
कुंभी नदीवरील - शेनवडे, कळे (खा), वेतवडे व मांडूकली. 
वेदगंगा नदीवरील - कुरणी, सुरुपली, बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव, चिखली व शेळोली. 
हिरण्यकेशी नदीवरील - साळगाव, ऐणापूर, गिजवणे व जिलजी. 
घटप्रभा नदीवरील - बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. 
ताम्रपणी नदीवरील - कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी. 
शाळी नदीवरील - येळावणे, कोळगाव व टेकोली. 
धामणी नदीवरील - सुळे, आंबर्डे, पनोरे व गवसी असे एकूण 80 बंधारे पाण्याखाली आहेत. 

सुतारवाडीतील कुटूंबाचे स्थलांतर

पंचगंगा नदी पाणीपातळी धोक्याकडे सरकत आहे. दुपारी तीन वाजता पातळी ४२.१ फूट इतकी होती. शहरातील काही भागात पुराचे पाणी आल्याने नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.  सुतारवाडा भागातील पाच कुटुंबे आणि १८ नागरिकांना  खबरदारी म्हणून स्थलांतरित केले आहे. मुस्लिम बोर्डिंग येथे त्यांच्या राहण्याची सोय केली आहे.

वारणेची पाणी पातळी 626.90

वारणा धरणातील जलाशयाची पाणी पातळी ६२६.९० मी. इतकी झाली आहे. धरण परिसरात अतिवृष्टी होत असून पावसाचा जोर  कायम आहे.  आज दुपारी बारा वाजता 2500  क्युसेक्स इतका विसर्ग धरणाच्या सांडव्यावरुन नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने, नदीकाठच्या सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, याकामी सर्व स्तरांवर सावधानतेबाबत इशारा देण्यात येत आहे.

इचलकरंजीत युवकास वाचवले

पंचगंगा नदी पात्रात इचलकरंजी येथे एक युवक पडला.  तो झाडावर अडकला आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाचे आधार रेसक्यू फोर्साचे जवान त्याला बाहेर काढत आहेत. 

पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 40.38 मिमी एकूण 434.79 मिमी, शिरोळ- 37.71 मिमी एकूण 327  मिमी, पन्हाळा- 68.29 एकूण 1088.14 शाहूवाडी- 73.67 मिमी एकूण 1489.17 राधानगरी- 81.50 मिमी एकूण 1410.83 मिमी, गगनबावडा- 154.50 मिमी एकूण 3228 मिमी, करवीर- 67.91 मिमी एकूण 876.09 मिमी, कागल-  60.14 मिमी एकूण 850.57 मिमी, गडहिंग्लज- 13.43 मिमी एकूण 575.29 मिमी, भुदरगड- 45.40 मिमी एकूण 1122.20 मिमी, आजरा- 44  मिमी एकूण 1416.25  मिमी, चंदगड- 29.50 मिमी एकूण 1379 मिमी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood situation in Kolhapur