पूरग्रस्तांसाठी सांगलीत आज सर्वपक्षीय मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

सांगली - महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, कष्टकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना दोन हेक्‍टरपर्यंत संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी  आज (ता. ३१) जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे.

सांगली - महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, कष्टकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना दोन हेक्‍टरपर्यंत संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी आज (ता. ३१) जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. 

जिल्ह्यात आलेल्या महापुरास सरकार जबाबदार आहे. धरणातून पाणी सोडताना कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नव्हता. अलमट्टीच्या अधिकाऱ्यांनी विसर्गाबाबत चुकीची माहिती देऊन फसवणूक केली आहे. महापूर राष्ट्रीय आपत्ती घोषित करून केंद्र सरकारने पूरग्रस्तांसाठी २५ हजार कोटींची मदत देण्याची गरज आहे. वारणा आणि कृष्णा नदीला आलेल्या महापूर दहा दिवस होता.

ऊस, सोयाबीन, केळी, द्राक्ष, हळद आणि भाजीपाला पीक पाण्यात राहिल्यामुळे कुजली असून त्याचे शंभर टक्के नुकसान झाले. शेतकऱ्यांचे एकरी लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासन वीस हजारांची मदत करून त्यांचे नुकसान भरून येणार नाही. या शेतकऱ्यांना पुन्हा उभा करण्यासाठी दोन हेक्‍टरपर्यंतचे शंभर टक्के  कर्जमाफी द्यावी. शेतकऱ्यांचे वीज बिल, पाणीपट्टी उपसा कर माफ करावे. बुडालेल्या विद्युत मोटारी, मीटर, ठिबक सिंचन संच, ग्रीन हाऊस, गोठा, पोल्ट्री, गुजहाळचे मोठे नुकसान झाले असून शंभर टक्के भरपाई शासनाने दिली पाहिजे आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for flood suffers all party agitation in Sangli