कोल्हापूर- सांगली मार्गावर हेरलेनजीक पुराचे पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

रुकडी - पावसाचा कहर आजही कायम राहिला असून रात्रभर संततधार सुरूच आहे. पंचगंगेच्या पुराचे पाणी  हेरले (ता. हातकणंगले) येथील देसाई मळा या ठिकाणी पाणी शिरले आहे. या ठिकाणी  कोल्हापूर - सांगली मार्गावर अडीच ते तीन फुट पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

या मार्गावरील गावांचा संपर्क कोल्हापूर शहराशी तुटला आहे. देसाई मळा येथील घरांमध्ये पाणी शिरल्याने सात कुटुंबांतील सुमारे चाळीस लोकांचे स्थलांतर हेरले गावात करण्यात आले  आहे.

दरम्यान, लहान वाहने हेरले मधून मौजे वडगाव मार्गे नागाव फाट्याकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाने जात आहेत.  हातकणंगले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरोलीकडून येणारी वाहने थांबवण्यात आली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood water near Herle on Kolhapur - Sangli road