पुणे बंगळूर महामार्गावर शिरोलीजवळ पंचगंगेचे पाणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

शिरोली पुलाची - पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आले आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पाणी यायला सुरवात झाली. सुमारे दीड फूट पाणी महामार्गावर असून, त्यामधूनच संथ गतीने वाहतूक सुरू आहे. 

शिरोली पुलाची - पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आले आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पाणी यायला सुरवात झाली. सुमारे दीड फूट पाणी महामार्गावर असून, त्यामधूनच संथ गतीने वाहतूक सुरू आहे. 

संततधार पावसामुळे दोन्ही सेवा मार्गावरील वाहतूक कालच बंद केली आहे. पूराच्या पाणी पातळी वाढत आहे. २००५ ला जेथून महामार्गावर पाणी आले होते. त्या ठिकाणावरुनच सायंकाळी पाचला पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर पाणी येण्यास सुरवात झाली. सुरवातीला एका बाजूला असणाऱ्या पाण्याने दोन तासात पूर्ण महामार्ग व्यापला. रात्री आठच्या सुमारास महामार्गावर एक ते दोन फूट पाणी होते. या पाण्यातूनच पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू होती.

पुराचे पाणी, तावडे हॉटेल येथील भुयारी मार्गात साठलेले पाणी आणि बघ्यांची गर्दीमुळे वाहतूक वारंवार विस्कळीत होत होती.
शिरोलीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या सेवामार्गावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक नागाव फाटा मार्गे महामार्गावर वळवली आहे. यामुळे सांगली फाट्यालाही वारंवार वाहतुक विस्कळीत होत होती. परिणामी महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यामुळे महामार्गावर एक ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

पुराच्या पाण्यातून वाहतूक सुरू

महामार्गावर पूराचे पाणी आलेल्या ठिकाणी सेवामार्ग व महामार्गाच्या दऱम्यान गटर आहे ; मात्र सुरक्षा कठडा नाही. पुराच्या पाण्यामुळे महामार्ग व सेवामार्ग ओळखून येत नाही. अशा धोकादायक स्थितीमध्येच महामार्गावरून पुराच्या पाण्यातून वाहतूक सुरू होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood water on Pune Bangalore highway near Shiroli Kolhapur