पूरबाधीत गावांना कर्जमाफी द्या ः शरद पवार

सचिन देशमुख
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

शरद पवार हे सांगली व कऱ्हाड भागातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी कराड येथे आले होते.

कऱ्हाड ः पूरबाधीत झालेल्या गावांची कर्जमाफी करावी. शेती, व्यवसाय, बलुतेदारांची कर्जे माफ करण्याबाबत राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केली. 
पवार हे सांगली व कऱ्हाड भागातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी येथे आले होते. पाहणीपूर्वी येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यावेळी ते बालेत होते. यावेळी त्यांच्यासमवेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, रोहित पवार उपस्थित होते.

यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती राजेश पवार, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, डॉ. इंद्रजित मोहिते, देवराज पाटील, अविनाश मोहिते आदींनी पवार यांना आपआपल्या भागातील पूरस्थितीचा आढावा दिला.

यावेळी पाटणकर यांनी तांबवेतील पाण्यात घरे असणाऱ्या कुटुंबाना दररोज लागणाऱ्या साहित्याची अपेक्षा आहे. त्यावर मदतीसाठी केंद्र व राज्य सरकारशी वेगळे बोलू असे पवार यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flooded villages should be given debt waiver says Sharad Pawar