कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला 

हेमंत पवार 
शनिवार, 21 जुलै 2018

कऱ्हाड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाऊस कायम आहे. त्यामुळे धरणात येणाऱया पाण्याची आवक सुरुच आहे. परिणामी पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी आज (शनिवारी) दुपारी बारा वाजता कोयना धरणाचे दरवाजे पाच फुट उचलुन पाण्याचा 24 हजार क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे.

दरम्यान आज सकाळी धरणातील पाणीसाठा 83.65 टीएमसी होता. तर धरणामध्ये 32 हजार 863 क्युसेक्स पाण्याची आवक होत होती. आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयननगरमध्ये 55, नवजात 77, आणि महाबळेश्वरला 69 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

Web Title: flow increase from koyana dam