सांगलीत 29, 30 ला पुष्पप्रदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

सांगली - रोझ सोसायटीच्यावतीने शनिवारी व रविवारी (ता. 29 व 30) गुलाब पुष्प प्रदर्शन व पुष्परचना स्पर्धा आयोजित केल्या आहेत. उपक्रमाचे यंदा 41 वे वर्ष आहे. संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब चितळे, एस. आर. जगदाळे, तानाजी चव्हाण, प्रकाश चव्हाण, अतुल दप्तरदार यांनी ही माहिती दिली. 

शनिवारी सकाळी पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, उद्योजक गिरीश चितळे, लीना चितळे यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन होईल. प्रदर्शनात पुष्पमांडणी, प्रदर्शन, ग्लॅडीएटर, हरितगृहातील गुलाब, जर्बेरा, मुलांसाठी पुष्परचना, अपंग, मूक-बधिर-मतिमंदांसाठी पुष्परचना, फुलांची रांगोळी, बोनसाय डिस्प्ले, व्यावसायिकांसाठी स्पर्धा, उत्कृष्ट माळी आदी विभाग केले आहेत.

किंग ऑफ दी शो, क्वीन ऑफदी शो, प्रिन्स ऑफ दी शो, प्रिन्सेस ऑफ दी शो, जनरल चॅंपियनशीप, फ्लोरीस्ट ट्रॉफी अशी बक्षिसे दिली जातील. यंदाच्या प्रदर्शनासाठी पंढरीची वारी ही मध्यवर्ती संकल्पना ठेवली आहे. फुलांच्या माध्यमातून पंढरीची वारी साकारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोलकत्त्याचे कलाकार यावर्षी फुलांपासून मोराची प्रतिकृती साकारणार आहेत.

गोवा, कोल्हापूर, सातारा, पुणे यासह विविध जिल्ह्यांतून सुमारे दोनशे स्पर्धक सहभागी होतील. रविवारी संध्याकाळी उपवनसंरक्षक भारत सिंह हाडा, उपसंचालक डॉ. विनीता व्यास यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण होईल. नागरिकांसाठी दहा रुपये प्रवेश शुल्क आहे. 

Web Title: flower show in Sangli on 29, 30 September