माणच्या पूर्व भागात चाऱ्यासह पाणीटंचाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

कुकुडवाड - माण तालुक्‍यातील पूर्वेकडील भागातील कुकुडवाड, वडजल, वळई, विरळी, वरकुटे, शेनवडी, पुळकोटी, विरळी परिसरात चारा व पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. 

कुकुडवाड - माण तालुक्‍यातील पूर्वेकडील भागातील कुकुडवाड, वडजल, वळई, विरळी, वरकुटे, शेनवडी, पुळकोटी, विरळी परिसरात चारा व पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. 

या परिसरात सुरवातीस काही गावांमध्ये वळीवचा पाऊस पडला. त्यानंतर या परिसरात पावसाने दडी मारली. त्यामुळे काही गावांत खरिपाची पेराही झाली नाही. पेरणी झालेल्या गावांतील पिके उन्हामुळे करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. माळरानावर आलेले गवतही करपून गेले आहे. काही प्रमाणात हिरवे दिसणारे गवत जनावरांच्या तोंडालाही येत नाही. दिवसभर माळावर हिंडून जनावरे आली, तरी रिकाम्यपोटी दिसतात. त्यातच पेरणी न झाल्याने घरी असणारा चाराही काही दिवसापासून संपून गेला असल्याने जनावरांची उपासमार होत आहे. पाणीटंचाईची समस्या असलेल्या गावांत टॅंकरने पाणी देण्याची मागणी होत आहे. चारा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. वळई येथील विठोबा काळेल या मेंढपाळने समस्यांचा पाढा वाचला.

वाढते कुपोषण व साथीच्या आजारामुळे जनावरे मोठ्या प्रमाणात दगावत आहेत. अनेक महिन्यांनी जनावरे घेऊन गावी आलो तरी तेच दिवस आहेत. हंगामी पावसावर शेती अवलंबून आहे. जेवढे शेतात घातले. तेवढेही उत्पन्न निघत नाही. शेळ्या- मेंढ्या विकाव्यात तर उपजीविका कशी करायची?
- विठोबा काळेल, मेंढपाळ

Web Title: fodder and water shortage