करमाळा तालुक्यातील दुष्काळी भागात पशुपालकांना करावा लागतोय चारा टंचाईचा सामना 

राजाराम माने
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

केतूर(सोलापुर) - यंदा पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने आत्तापासूनच चारा टंचाईचा सामना करण्याची वेळ पशुपालकावर आली आहे. करमाळा तालुक्याच्या जिरायती भागातील शेतकरी तालुक्याच्या उजनी लाभ क्षेत्रातील ऊस पट्टयात ऊसतोडणी चालू आहे अशा ठिकाणी जाऊन वाड्याची खरेदी करत आहे.हुमनी तसेच कीड लागलेले वाढे चढ्या भावाने पशुपालकांना खरेदी करावे लागत आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न सोडविण्याची लगबग पशूपालकांमध्ये दिसून येत आहे तालुक्यात ऊस तोड हंगाम सुरू असून ऊस तोड मजूर उसाबरोबर आपल्या वाहनांमधून वाडे आणून विक्री करत आहेत तर काही पशुपालन थेट ऊसतोड रानातच (शिवारात) जाऊनच वाढे खरेदी करत आहेत व आपल्या वाहनातून ते नेत आहेत.

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना हिरव्या चाऱ्याची आवश्‍यकता असल्याने परिसरातील शेतकरी ऊस तोड मजूरा कडून वाढे खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.या परिसरातील शेतकऱ्यांच्या पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला तर रब्बी हंगामाची ही अवस्था तशीच असल्याने शेतात हिरव्या चाऱ्याची टंचाई झाले आहे शेतकरी पशुपालक वाडे (१0 वाड्याची पेंडी) दीडशे ते दोनशे रुपये शेकडा याप्रमाणे खरेदी करून आणलेल्या वाहनातून नेत आहेत ऎन हिवाळ्यातच जनावरांना हिरवा चारा कमी पडत आहे, तर उन्हाळ्यात कसे होणार ? या चिंतेने पशुपालक हैराण झाला आहे.सध्यातरी दूध व्यवसायासाठी उसाच्या वाड्याचाच आधार असल्याचे दिसून येत आहे.

दुभत्या जनावरांना हिरवा चारा खायला मिळत नसल्याने दूध उत्पादनात घट झाली आहे. दुधाचे दर देखील घसरले आहेत चारा विकत घेऊन जनावरांना खाऊ घालावा लागत असल्याने हा धंदा अडचणीचा बनला आहे,त्यातच पशुखाद्याचे दरही वाढले आहेत त्यामुळे दुग्ध व्यवसाय सध्यातरी तोटयाचाच ठरू लागला आहे.

Web Title: Fodder scarcity is faced in the drought-hit areas of Karmala taluka