माढा तालुक्यातही धुके

किरण चव्हाण
बुधवार, 19 डिसेंबर 2018

माढा (सोलापूर) - माढा तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात बुधवारी (ता.१९) पहाटे सर्वत्र धुके पडले होते. यामुळे सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गसह जिल्ह्यातील पहाटेची वाहतूक ठप्प झाली होती. 

माढा (सोलापूर) - माढा तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात बुधवारी (ता.१९) पहाटे सर्वत्र धुके पडले होते. यामुळे सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गसह जिल्ह्यातील पहाटेची वाहतूक ठप्प झाली होती. 

जिल्हयात काही अंशी उपलब्ध असलेल्या रब्बी पिकांवर, द्राक्ष बागा, हरभरा, ज्वारी यासारख्या पिकांवर या धुक्याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. धुके खुपच दाट असल्याने चार - पाच फुटांसमोरीलही काहीही दिसत नव्हतं. त्यानंतर त्यामुळे अनेकांनी वाहने रस्त्याकडेला थांबवणे पसंत केले. सध्या सोलापूर - पुणे इंटरसीटी बंद असल्याने अनेकजण पुण्याला जाण्यासाठी खाजगी भाडोत्री अथवा स्वत:च्या वाहणाने पहाटेच निघतात. अशा प्रवाशांच्या धावपळीलाही या धुक्याने ब्रेक दिला. अनेकांनी धुके पहाण्याचाही आनंद घेतला. सकाळी साडेसात वाजेपर्यंत धुक्याचा परिणाम जाणवला. त्यानंतर धुके कमी होत गेले.

Web Title: Fog in Madha taluka