विठ्ठल भक्‍तांना धुक्‍याची चादर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पंढरपूर - शहरासह ग्रामीण भागात बुधवारी सकाळी सर्वत्र धुके दाटले होते. भागवत एकादशीनिमित्त पंढरपुरात आलेल्या भाविकांनी या धुक्‍याचा दुलईचा आनंद लुटला.

पंढरपूर - शहरासह ग्रामीण भागात बुधवारी सकाळी सर्वत्र धुके दाटले होते. भागवत एकादशीनिमित्त पंढरपुरात आलेल्या भाविकांनी या धुक्‍याचा दुलईचा आनंद लुटला.

चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्गासह शहरात आज पहाटे धुक्‍याची चादर पसरली होती. महाद्वार घाटावर उभे राहिले असता, नेहमी दिसणारी पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरे धुक्‍यामुळे दिसत नव्हती. भाविक कडाक्‍याच्या थंडीत भक्तिभावाने नदीत स्नान करीत होते. काही उत्साही नागरिकांनी मित्रमंडळींना मोबाईलवरून धुक्‍याची माहिती दिली. उत्साही तरुणाईने सेल्फीसह फेसबुक लाईव्हवरदेखील धुक्‍यामध्ये फिरतानाचे व्हिडिओ, फोटो अपलोड केले व अनेक लाइक्‍स मिळवले. सकाळी साडेनऊपर्यंत धुके होते.

पारा 12 अंशांपर्यंत खाली
पंढरपूरमधील तापमानाचा पारा आज पहाटे 12 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच तापमान एवढ्या नीचांकी पातळीवर घसरले होते. अशातच पहाटेपासून बोचरे वारे सुटल्याने थंडीच्या कडाक्‍यात वाढ झाली होती.

Web Title: Fog in Pandharpur