निवडणुकीत कायदेशीर नियमांचे पालन करा, अन्यथा कडक कारवाई- हनुमंत गाडे

सनी सोनावळे
मंगळवार, 22 मे 2018

टाकळी ढोकेश्वर (नगर) : कान्हुर पठार (ता.पारनेर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटातील प्रमुख व ग्रामस्थांसमवेत पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांची काल (ता. 21) येथील ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली.

टाकळी ढोकेश्वर (नगर) : कान्हुर पठार (ता.पारनेर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटातील प्रमुख व ग्रामस्थांसमवेत पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांची काल (ता. 21) येथील ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली.

यावेळी डी.सी.व्यवहारे, गोकुळ काकडे, सखाराम ठुबे, चंद्रभान ठुबे, शिवाजी शेळके यांच्यासह दोन्ही गटाचे व अपक्षासंह सर्व उमेदवार उपस्थित होते.
गाडे यांनी गावात लावलेले निवडणुकीचे फ्लेक्स बोर्डांकरीता ग्रामपंचायतीची व खाजगी क्षेत्रात जेथे लावण्यात आले आहेत तेथील परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगत मतदान केंद्रावर 100 मीटरच्या आत चारचाकी व दुचाकी वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही, जे वयोवृद्ध असतील त्यांच्यासाठी व्हील चेअर खुर्चीची व्यवस्था करण्यास त्यांनी सांगितले.

गावातील ज्यांच्यावर भांडणे, मारामारी यासंह अन्य बाबींचे गुन्हे दाखल आहेत त्यांनाही पोलीस ठाण्यात बोलावुन सुचना देण्यात येणार आहेत. निवडणुका नि:पक्षपातीपणे पार पडतील याची दक्षता घेणे व नियंत्रण करणे, ही सर्व कामे होत असताना शासकीय कामकाजाच्या बाबतीत अंमलबजावणी होताना काही कमतरता भासली तर आपण तक्रारी आणाव्यात त्याचे निवारण करण्यात येईल. 

सर्वांनी कायद्याचे व नियमांचे पालन करावे.प्रत्येकाने कायद्याप्रती आदर ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे चांगला व सभ्य समाज निर्माण होतो. त्यासाठी प्रत्येकाच्या मनात कायद्याविषयी व समाजातील प्रत्येक घटकाविषयी आदरभाव विकाशित होणे गरजेचे आहे.

Web Title: follow the rules while election otherwise take serious action said hanumant gade