अक्कलकोटमध्ये गरजूंसाठी फुडबँक

akkalkoth
akkalkoth

अक्कलकोट - आज १६ ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. जगाचा पोशिंदा हा शेतकरी असून तो पूर्ण जगाला अन्न पुरविण्याचे काम करतो आहे. भारतात काही जण प्रतिकूल परिस्थितीत अडकले आहेत. त्यांना दररोज आपले लागणारे अन्न मिळविण्यासाठी सतत झगडावे लागत आहे. ज्यांच्याकडे लग्न, विविध समारंभ, वाढदिवस आदी कारणांमुळे जादा अन्न तयार केले जाते ते वाया जाऊ नये यासाठी सोलापुरात भूकमुक्त भारतासाठी सतीश तमशेट्टी व मित्रांनी जयहिंद फुडबँक सुरू करून गरजूंचा आधार बनला आहे. 

त्यापासून प्रेरणा घेऊन अक्कलकोटला अंकुश चौगुले व मित्र परिवाराने त्याची शाखा सुरू केली आहे. अक्कलकोटमध्ये जय हिंद फूड बँकेच्या उपक्रमातून निराधारांना व भुकेलेल्याना वाया जाणार अन्न देण्याचा देण्याचा निर्णय घेतला आहे. रामनवमीच्या दिवशी सतीश तमशेट्टी, अंकुश चौगुले व त्यांच्या अक्कलकोटमधील मित्रपरिवारांच्या वतीने अक्कलकोटमध्ये हा उपक्रम हाती घेतला आहे. जयहिंद फूड बँकेने आपले सर्व सदस्य आणि गावातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या शहरवासियांचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनविला आहे. कार्यक्रम संपल्यानंतर संबंधितांकडून या समूहाला निरोप येतो त्यानंतर व्हाट्सएपच्या माध्यमातून ग्रुपवर निरोप दिला जातो. आणि जे सदस्य मोकळे असतात ते जाऊन सदर अन्न स्वीकारतात आणि शहरातील ज्या भागात गरजू राहतात त्यांना ते जागेवर जाऊन दिले जाते. त्यामुळे अन्नाची नासाडी थांबून ते सत्कारणी लावले जाते. 

कार्यक्रम झाल्यानंतर चार तासातच दुग्धजन्य व कांदाजन्य पदार्थ वगळून खराब न झालेले इतर पदार्थ स्वीकारले जातात. ते सर्व अन्न उपेक्षित व ज्यांना आवश्यक आहे त्यांना जागेवर नेऊन दिले जात आहे. याकामात अशोक जाधव, अतिष पवार, हिरा बंदपट्टे, शिवशरण चौगुले, आनंद जाधव, योगेश पवार, दत्तू मेंथे, आकाश चौगुले, महेश लिंबोळे, सिद्धू माळी यांचे सहकार्य मिळत आहे.

दिवाळीस गरजूंना फराळ उपक्रम
भारत हा विज्ञान, तंत्रज्ञान आणि इतर गोष्टीने कितीही पुढे गेले तर गरिबी आणि भूक बळी हा प्रश्न काही सुटला नाही. म्हणून हा उपक्रम सुरू केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दिवाळीस गरजूंना फराळ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.नागरिकांनी आपले घरातील फराळ थोडेशे वाढवून करावे आणि आम्हाला निरोप द्यावा. आपल्या घरी येऊन घेऊन जाऊन वंचितांना दिवाळी साजरी करण्यास मदत करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com