शहरातील फूटपाथ, मैदाने बनली ओपन बार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

टेंबलाई नाका ते विद्यापीठ फूटपाथवर सर्वाधिक गर्दी

कोल्हापूर - टेंबलाई नाका उड्डाणपुलापासून कृषी महाविद्यालय, पुढे शिवाजी विद्यापीठाकडे जाणारा रस्ता ओपन बार बनला आहे. रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथच्या बाजूला बाटल्यांचा खच पडला असून शहराच्या अन्य भागातही रात्री उशिरापर्यंत ओल्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत. 

टेंबलाई नाका ते विद्यापीठ फूटपाथवर सर्वाधिक गर्दी

कोल्हापूर - टेंबलाई नाका उड्डाणपुलापासून कृषी महाविद्यालय, पुढे शिवाजी विद्यापीठाकडे जाणारा रस्ता ओपन बार बनला आहे. रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथच्या बाजूला बाटल्यांचा खच पडला असून शहराच्या अन्य भागातही रात्री उशिरापर्यंत ओल्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत. 

खुल्या मैदानात बाटल्या फोडण्याच्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. या परिसरात मॉर्निग अथवा सायंकाळी चालण्यासाठी येणाऱ्या लोकांना काचा लागून मोठा मनस्ताप यामूळे सहन करावा लागत आहे. रस्ते प्रकल्पातंर्गत टेंबलाई नाका उड्डाणपूल ते शिवाजी विद्यापीठापर्यंतच्या रस्त्याचे रूंदीकरण 
झाले आहे. रस्त्याच्या दुर्तफा नागरी वस्ती नसल्याने वाहनांच्या वर्दळीशिवाय येथे फारसे नजरेस पडत नाही. दोन्ही बाजूला फूटपाथ, नागरी वस्तीचा अभाव यामुळे सायंकाळी सातनंतर ओपन बार जोरात सुरू होते. या ठिकाणी मद्य पिऊन बाटल्या फोडण्याचे ही प्रकार घडतात. त्यामूळे या परिसरात फिरण्यास येणाऱ्या नागरीकांना त्रास होत आहे. एककीडे या ठिकाणी शहराच्या सौदर्यांत भर घालणार सुंदर प्रकल्प उभा असून त्याच्याजवळच हे दृश्‍य पाहवायस मिळत असल्याने शहराच्या सौदर्यांकरणामध्ये विसंगती तयार होताना दिसत आहे. 

सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर पाचशे मीटरपर्यंत अतंरापर्यंतचे बार बंद झाले आहेत. शहरातील ८८ बार आणि वाईन्स बंद आहेत. हाताच्या बोटावर मोजता येतील इतके बार आणि वाईन्सची दोन तीन दुकानेच सुरू आहेत. येथे सायंकाळी पेट्रोल पंपावर रांग असते, तशी रांग दारूच्या दुकानात असते. येथून पार्सल घेतली की फूटपाथ. खुल्या मैदानात पार्टी सुरू होते. 

उड्डाण पूल ते शिवाजी विद्यापीठापर्यंतच्या दुर्तफा फूटपाथवर एैसपैस जागा आहे. पोलिस फिरकण्याची शक्‍यता नसल्याने दोन्ही बाजूला मैफल रंगते. रात्रीचा रंग भरू लागला की पुन्हा पार्सल आणून मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर हुल्लडबाजी सुरू असते. रस्त्यावर पाय सोडून ओल्या पार्टीचा आनंद घेतला जातो. पहाटे आणि अथवा सकाळी वॉकिंगला येणाऱ्याना याचा मनस्ताप होतो. बाटल्यांचा खच पायात पडलेला असतो. व्यायाम करायचा की बाटल्या गोळा करायचा असा प्रश्‍न ज्येष्ठांना पडला आहे.

बाटल्या फोडण्याचा संतापजनक प्रकार अलीकडे वाढू लागला आहे. दूसऱ्या दिवशी काच कुणाच्या पायाला लागून ईजा होईल याची चिंता न करता बियरच्या बाटल्या फोडल्या जातात. बार बंद झाले खरे पण रात्रीच्या ओपन बारमुळे शहरवासियांची डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांच्या अधून मधून चक्करा असतात मात्र पोलिस तरी कुठे कुठे लक्ष देणार असाही प्रश्‍न आहे. 
 

खुल्या जागांचा आधार
राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी व्यायामासाठी येणाऱ्यांना असाच अनुभव येत आहे. बार बंद झाल्यापासून खुल्या जागा रस्ते तळीरामांसाठी हक्काची ठिकाणे बनली आहेत. गोळीबार मैदान. राजाराम बंधारा परिसर, पॅव्हेलियन मैदान. मेरी वेदर मैदान बाजूचे फूटपाथ, रूईकर कॉलनी, कदमवाडी, जाधववाडी. मार्केट यार्ड परिसर, विक्रमनगर टेंबलाईवाडीचा परिसर. दौलतनगरसह, शाहूनगर, राजारामपुरी परिसर. पंचगंगा नदीघाट, शिवाजी स्टेडीयमचा परिसर, गांघी मैदान, महापालिका शाळांची मैदाने. उद्याने,  रंकाळा तलाव, तपोवन मैदान, पुईखडी, आयसोलेशन रोड, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम, उपनगरातील खुल्या जागा येथे रात्री उशीरापर्यंत मैफल जमू लागली आहे.

Web Title: footpath, ground open bar in kolhapur city