माहिती आहे का? सोलापुरात सुरु होतेय फॉरेन्सिक लॅब!

माहिती आहे का? सोलापुरात सुरु होतेय फॉरेन्सिक लॅब!

सोलापूर : राज्यात सध्या 8 विभागीय आणि 5 लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) आहेत. फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून वर्षभरात जवळपास अडीच लाख प्रकरणांची तपासणी केली जात आहे. सोलापूरच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये रक्त, विष आणि व्हिसेरा तपासणी होणार आहे. भविष्यात फॉरेन्सिक लॅबमध्ये अल्कोहोल संदर्भातील प्रकरणांचीही तपासणी होणार असल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) हेमंत नगराळे यांनी सांगितले. 

हेही वाचा - लोकांचे पैसे बुडवण्यासाठी केला चोरीचा बनाव! 

फोरेन्सिक लॅबमुळे गुन्ह्यांच्या तपासाला मिळणार गती 
राज्य शासनाच्या गृह विभागाच्यावतीने सोलापुरात राज्यातील पाचवी लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फोरेन्सिक लॅब) सुरु करण्यात येत आहे. या प्रयोगशाळेचे उद्‌घाटन महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) हेमंत नगराळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. 17) सकाळी 11 वाजता जुळे सोलापूर येथील नरसिंह नगरात होणार आहे. फोरेन्सिक लॅबमुळे गुन्ह्यांच्या तपासाला मिळणार गती मिळणार आहे.

हेही वाचा - लाचेची रक्कम कमी करण्यास नकार! पहिला हप्ता म्हणून घेतले..

आठ ठिकाणी न्यायसहायक वैज्ञानिक प्रादेशिक प्रयोगशाळा
सोलापुरातील फॉरेन्सिक लॅबच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने पोलिस महासंचालक नगराळे सोलापुरात आले आहेत. यानिमित्ताने "सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. पोलिस महासंचालक नगराळे म्हणाले, "मी ऑक्‍टोबर 2018 मध्ये या विभागाचा पदभार स्वीकारला. राज्यात न्यायसहायक वैज्ञानिक प्रादेशिक प्रयोगशाळा आठ ठिकाणी आहेत. त्या मुंबई, पुणे, औरगाबाद, नागपूर अमरावती, नाशिक, नांदेड आणि कोल्हापूर येथे आहेत. याचबरोबर चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे आणि सोलापूर या पाच ठिकाणी लघु प्रयोगशाळा सुरु करण्यास मान्यता दिली होती. यापैकी चार ठिकाणी प्रयोग शाळा सुरु झाल्या आहेत. आता सोलापूरातील प्रयोगशाळेचे शुक्रवारी उद्‌घाटन होत आहे.' 

हेही वाचा - चोरून नेलेली दुचाकी, मोबाईल पाहिजे असेल तर...

सोलापुरातील लॅबमध्ये जिवशास्त्र आणि विषशास्त्र विभाग
"फॉरेन्सिक लॅबमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमालावर शास्त्रीय पद्धतीने विश्‍लेषणाचे कार्य केले जाते. शास्त्रीय विश्‍लेषणाद्वारे देण्यात येणारा परिस्थितीजन्य पुरावा न्यायालयामध्ये भक्कम पुरावा म्हणून उपलब्ध करून दिला जातो. मयताचा व्हिसेरा, रक्त, उलटी, आरोपीच्या, मयताच्या रक्ताचे कपडे, व्हजानयल स्वॅब, विर्य, केस आदी जैविक मुद्देमाल घेऊन पोलिसांना पुण्यातील प्रयोगशाळेत जाण्यास वेळ लागत होते. आता सोलापुरातील लॅबमध्ये जिवशास्त्र आणि विषशास्त्र विभाग सुरु करण्यात येत आहेत. याठिकाणी रक्त, विष आणि व्हिसेरा तपासणीला सुरवात होत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. फोरेन्सिक लॅबमुळे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील गुन्हेविषयक तपास कामात गती मिळेल. सोलापुरातील प्रयोगशाळेस 28 अधिकारी कर्मचारी मंजूर आहेत. त्यापैकी न्यायवैद्यक क्षेत्राशी निगडित सात अधिकारी असणार आहेत. ​

फॉरेन्सिक लॅब विभागात देशातील अत्याधुनिक यंत्रणा आपल्याकडे आहेत. सोलापुरातील लॅबमध्ये रक्त, विष आणि व्हिसेरा तपासणी होतील. लवकरच अल्कोहोल संदर्भातील प्रकरणांच्या तपासणीला सुरवात होईल. फॉरेन्सिक लॅबचे काम अधिक सोयीचे व्हावे यासाठी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. 
- हेमंत नगराळे, 
पोलिस महासंचालक, न्यायिक व तांत्रिक विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com