उंची, वजन घेण्याआधीच धावण्याची चाचणी

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - उंची, वजन व छातीचे माप नियमानुसार असणाऱ्या उमेदवारालाच धावण्याची चाचणी देता येईल, असा नियम आहे. तत्कालीन मुख्य वनसंरक्षक एम. के. राव व उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी हा नियम डावलून आधी धावण्याची चाचणी घेतली. त्यानंतर उंची, छाती व वजन तपासले. धावण्यात यशस्वी झालेले अनेक उमेदवार उंची, छाती व वजनाच्या नियमात बाद झाल्याने अनेक प्रवर्गांतील उमेदवारांना राव व नाईकडे यांच्या भोंगळ कारभाराचा फटका बसून पात्र उमेदवारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. असा उलटा नियम लावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हेतूवर शंका घेतली जात आहे.

भरती करताना ज्या-त्या प्रवर्गासाठी एकास तीन म्हणजे एका उमेदवाराची भरती करायची असेल तर तीन उमेदवार निवडायचे होते. यासाठी पहिल्यांदा वजन-उंचीमध्ये पात्र ठरतील, त्या प्रत्येकाला धावण्याच्या चाचणीत प्रवेश मिळाला असता. धावण्यातून जे उमेदवार नियमानुसार प्रथम, द्वितीय किंवा तृतीय येतील, त्यांची थेट भरती करता आली असती. असे न करता आलेल्या १३ हजार उमेदवारांची पहिल्यांदा धावण्याची चाचणी घेतली. चाचणी घेतल्यानंतर जे धावण्याच्या स्पर्धेत बाहेर पडले, त्यांना बाद ठरवून भरतीतून बाहेर काढले. उर्वरित जे होते, त्यांच्यातील अनेकांची पहिल्या नियमानुसार वजन-उंची पात्र होत नव्हती; तर दुसरीकडे इतर उमेदवारांना यापूर्वीच बाद ठरविल्याने वजन-उंचीमध्ये पात्र ठरणारे उमेदवारही बाहेर राहिले. त्यामुळे जे उपलब्ध आहेत, त्यांच्यातीलच लोकांची भरती करून घेतली. अशा प्रकारे नियम डावलून भरती का करून घेतली, हाच कळीचा मुद्दा आहे.

पात्र विद्यार्थ्यांचा बळी
वनरक्षक भरती प्रक्रिया राबविताना पहिल्यांदा उमेदवारांच्या शारीरिक पात्रता तपासणीत उंची, छातीचे माप व वजन घेऊन नियमानुसार पुरुषांसाठी पाच किलोमीटर व महिलांसाठी तीन किलोमीटर धावण्याची चाळणी चाचणी परीक्षा घेण्याची सूचना होती. याबाबत वेळापत्रक किंवा नियमावली राज्यातील प्रत्येक सर्कलला पाठविली होती. इतर ठिकाणी याचे तंतोतंत पालन झाले. कोल्हापुरात मात्र वनरक्षक भरतीची उलटी गंगा वाहिली. याच उलट्या गंगेत पात्र विद्यार्थ्यांचा हकनाक बळी गेला.

Web Title: forest recuritment

टॅग्स