गुणांत फेरफार करत वनरक्षक भरतीत घोटाळा 

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 30 जानेवारी 2017

13 हजार उमेदवारांवर अन्याय : वन अधिकाऱ्यांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न 
कोल्हापूर :  वनरक्षक पदासाठी बारावीचे गुणपत्रक आणि धावण्याच्या चाचणीतील गुण ग्राह्य धरून भरती करण्यात येणार होती. लेखी परीक्षा नसल्याने धावण्याच्या चाचणीला महत्त्व होते. पण याच चाचणीत ज्याला शून्य गुण मिळाले आहेत अशांना दहा गुण देऊन तत्कालीन मुख्य वनसंरक्षक एम. के. राव आणि उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी पात्र उमेदवारांवर अन्याय करत 2014-15 च्या वनरक्षक भरतीत घोटाळा केला आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर 13 हजार बेरोजगारांचा रोष पत्करावा लागेल, या भीतीने हे प्रकरण दडपण्यात आले आहे. 

जिल्ह्यात वनरक्षकांच्या भरतीसाठी फाइव्हस्टार एमआयडीसी येथे धावण्याची चाचणी झाली. यामध्ये 13 हजार उमेदवारांनी सहभाग घेतला. यापैकी 48 उमेदवारांची भरती झाली. वास्तविक पुरुषांना 5 किलोमीटर व महिलांसाठी 3 किलोमीटर धावण्याच्या चाचणीत पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक येणाऱ्या उमेदवाराला साडेबारापैकी 10 गुण द्यावे लागणार होते. त्यानंतर, 4 ते 8 वा क्रमांक येणाऱ्या पाच उमेदवारांना 8 गुण, 9 ते 15 वा क्रमांक येणाऱ्या सात उमेदवारांना 6 गुण, 16 ते 25 क्रमांक येणाऱ्या दहा उमेदवारांना 4 गुण व 26 ते 40 क्रमांक येणाऱ्या 15 उमेदवारांना 2.5 गुण देण्याचा नियम आहे. मात्र, याचा विचार न करता पात्र उमेदवारांना शून्य ते चार गुण दिले, तर अपात्र उमेदवारांना 10 गुण देण्याचा पराक्रम वन अधिकाऱ्यांनी केला आहे. 
वनरक्षक पदासाठी लेखी परीक्षा नव्हती. त्यामुळे शारीरिक चाचणीला महत्त्व होते. तोंडी परीक्षेतून पात्र उमेदवारांवर अन्याय होतो म्हणून शासनाने शारीरिक चाचणी परीक्षेला प्राधान्य दिले आहे. या परीक्षेतही गोलमाल करून "अर्थ'पूर्ण घडामोडीसाठी अधिकाऱ्यांनी शासनाचे नियम आणि अटी धाब्यावर बसविल्या आहेत. मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांच्याकडे काही उमेदवारांनी तक्रार केली; पण श्री. राव यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष करत आणि झालेली भरती योग्य असल्याचे सांगून निवड केलेल्या उमेदवारांना कामाची ऑर्डर दिली. श्री. राव यांनी तक्रार फेटाळल्यानंतर अपात्र उमेदवारांनी उपवनसंरक्षकांच्या या कारभाराविरुद्ध नागपूर येथील अपर प्रधान वनसंरक्षक डॉ. पी. एन. मुंडे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर मुख्य वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षक यांनी केलेली भरती चुकीची असल्याचे निदर्शनास आले. 

धावण्यासाठी असे होते नियम : 
पहिल्या येणाऱ्या केवळ तीन उमेदवारांस (1 ते 3) - प्रत्येकी 10 गुण 
चार ते आठ क्रमांक पटकाविणाऱ्यांस (4 ते 8)- प्रत्येकी 8 गुण 
9 ते 15 क्रमांक पटकाविणाऱ्यांस - प्रत्येकी 6 गुण 
16 ते 25 क्रमांक पटकाविणाऱ्यांस - प्रत्येकी 4 गुण 
26 ते 40 क्रमांक पटकाविणाऱ्यांस - प्रत्येकी 2.5 गुण 
त्यानंतर येणाऱ्या प्रत्येकाला शून्य गुण किंवा तो परीक्षेतूनच बाद ठरवावा. 
 
Web Title: forest security guard kolhapur exam