श्रीपाद छिंदमला राज्याबाहेर हाकला ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

नगर - छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यास राज्याबाहेर हाकलून देण्याच्या मागणीसाठी आज शिवसन्मान मोर्चा काढण्यात आला. शिवरायांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चाचा समारोप चौपाटी कारंजा येथे झाला. 

नगर - छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यास राज्याबाहेर हाकलून देण्याच्या मागणीसाठी आज शिवसन्मान मोर्चा काढण्यात आला. शिवरायांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चाचा समारोप चौपाटी कारंजा येथे झाला. 

छिंदम सध्या जामिनावर बाहेर आला आहे. कार्यालय फोडल्याच्या त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी 40 तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला काही राजकीय लोक पाठीशी घालत असल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला. त्यामुळे त्यास महाराष्ट्रातूनच हद्दपार करावे, या मागणीसाठी आज विविध संघटनांनी शिवसन्मान मोर्चा काढला. चौपाटी कारंजा येथे छत्रपती प्रतिष्ठानाचे ऍड. गजेंद्र दांगट यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निवेदन वाचून दाखविले. "आम्ही प्रशासनाला निवेदन देणार नाही. ते छत्रपती शिवरायांच्या चरणी ठेवणार आहोत. ते प्रशासनाने घेऊन जावे', असे आवाहन शिवप्रेमींनी केले. शिवरायांच्या पुतळ्याजवळ निवेदन ठेवल्यानंतर मोर्चाचे विसर्जन झाले. पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सदरचे निवेदन स्वीकारले. 

दरम्यान, मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर श्रीपाद छिंदम याच्या घराला पोलिसांनी सुरक्षेसाठी कडे घातले होते. 

अंत्ययात्रेसाठी मोर्चा थांबला 
शिवसन्मान मोर्चा माळीवाडा वेशीतून माणिक चौकाकडे जाताना पंचपीर चावडी येथून एका मुस्लिम महिलेची अंत्ययात्रा चालली होती. शिवप्रेमींनी पाच मिनिटे तेथेच थांबून अंत्ययात्रेला वाट मोकळी करून दिली.

Web Title: Former Deputy Mayor Shripad Chhindam nagar news