माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतले कोल्हापुरातील 'हे' पुरग्रस्त गाव दत्तक

माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतले कोल्हापुरातील 'हे' पुरग्रस्त गाव दत्तक

कोल्हापूर - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील महापुराची भीषणता पाहून इंदापूर विधानसभा मतदार संघाच्यावतीने आकिवाट गाव दत्तक घेतले आहे. या गावासाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून वर्षभर वेगवेगळ्या माध्यमातून मदत दिली जाणार आहे. येत्या रविवारी (१८ ऑगस्ट) ते २०० कार्यकर्त्यांसह गावात जाऊन स्वच्छता मोहीम राबवणार आहेत.

श्री. पाटील दहा वर्ष कोल्हापूरचे पालकमंत्री होते. त्याकाळात केलेल्या कामाबद्दल त्यांना जिल्ह्याने अनेक मान, सन्मान दिले. त्याची उतराई होण्यासाठी त्यांनी आकिवाट गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या गावात 25 लाखाच्या निधीतून विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. तसेच इतर माध्यमातून मदत देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. येत्या रविवारी (18 ऑगस्ट) सकाळी साडेनऊ वाजता श्री. पाटील गावास भेट देणार आहेत. तिथे दिवसभर स्वच्छता मोहीम ते राबवणार आहेत. या दरम्यान गावातील आगामी विकास कामांबाबत नियोजन केले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com