माजी आमदार देसाई अनंतात विलीन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

गारगोटी - राधानगरी-भुदरगडचे माजी आमदार व शाहू वाचनालयाचे अध्यक्ष आनंदराव देसाई यांना आज भावपूर्ण व गहिवरलेल्या वातावरणात अखेरचा निरोप दिला. शहरातून काढलेल्या अंत्ययात्रेत जिल्ह्यातील विविध राजकीय पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते. माजी आमदार बजरंग देसाई यांनी त्यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला. आज दुपारी ते अनंतात विलीन झाले.

गारगोटी - राधानगरी-भुदरगडचे माजी आमदार व शाहू वाचनालयाचे अध्यक्ष आनंदराव देसाई यांना आज भावपूर्ण व गहिवरलेल्या वातावरणात अखेरचा निरोप दिला. शहरातून काढलेल्या अंत्ययात्रेत जिल्ह्यातील विविध राजकीय पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते. माजी आमदार बजरंग देसाई यांनी त्यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला. आज दुपारी ते अनंतात विलीन झाले.

श्री. देसाई यांचा मंगळवारी मृत्यू झाला होता. आज सकाळी पार्थिव शहरात आणले. येथील बसस्थानकापासून अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. तत्पूर्वी मुदाळ, कूर, मडिलगे, कलनाकवाडी येथील ग्रामस्थांनी त्यांना अभिवादन केले. शाहू वाचनालयासमोर व घरी अनेकांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. सोनाळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार राजू शेट्टी, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, के. पी. पाटील, दिनकरराव जाधव, प्रकाश आवाडे, संजय घाटगे, "गोकुळ'चे अध्यक्ष विश्‍वास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, अरुण डोंगळे, वीरेंद्र मंडलिक, सभापती विलास कांबळे, बाबा देसाई, उदयसिंह पाटील, के. जी. नांदेकर, शामराव देसाई, पंडितराव केणे, सुनील कांबळे, अभिजित तायशेटे, अर्जुन आबिटकर, दिनकरराव कांबळे, यशवंत नांदेकर, विश्‍वनाथ कुंभार, बाबासाहेब पाटील, विजयसिंह मोरे, नंदकुमार सूर्यवंशी, सरपंच रूपाली राऊत, दत्तात्रय उगले, नंदकुमार ढेंगे, सचिन घोरपडे, नाथाजी पाटील, करणसिंह गायकवाड, पी. डी. धुंदरे, श्रीपतराव शिंदे, भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस, ऍड. गुलाबराव घोरपडे, सुधाकर साळोखे, दीपक पाटील, बी. एस. देसाई आदी अंत्ययात्रेत सहभागी झाले. प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, तहसीलदार सुनील चव्हाण यांच्यासह अधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. शहरातील व्यावसायिकांनी सकाळी दुकाने बंद ठेवून दुखवटा पाळला.
शोकसभेत आमदार प्रकाश आबिटकर, सतेज पाटील, दिनकरराव जाधव, के. पी. पाटील, संजय घाटगे, विश्‍वास पाटील, डॉ. जयंत कळके यांनी श्रद्धांजली वाहिली. दिवसभरात जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी माजी आमदार बजरंग देसाई, प्रकाश देसाई, धैर्यशील देसाई, राहुल देसाई यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

Web Title: Former MLA anandrao Desai