माजी आमदार शंकरराव गडाख पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर (व्हिडिओ)

Nagar
Nagar

नगर : क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख व नेवाशाचे माजी आमदार शंकरराव गडाख अटकेसाठी आज स्वत:हून पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयासमोर हजर झाले आहेत. पोलिसांनी आज अटक करावी, असा त्यांचा आग्रह होता. तथापि दुपारपर्यंत त्यांना पोलिसांनी अटक केली नव्हती. गडाख एकटेच कार्यालयात हजर झाले असले तरी, त्यांचे कार्यकर्ते इतरत्र थांबून असल्याचे समजते.


माजी आमदार गडाख व सुनील गडाख यांच्या अटकेसाठी पोलिसांनी काल (ता. 16) ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सोनई व नगरमधील बंगल्यांवर छापे घातले. अडीचशेपेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा घरात घुसल्याने घरातील महिला व लहान मुलांची तारांबळ उडाली. त्यावर जिल्हाभर पोलिसांच्या कारवाईबद्दल शंका उपस्थित करण्यात आल्या. अनेकांनी या कारवाईबद्दल नाराजीही व्यक्त केली. गडाख यांच्या शोधार्थ पोलिसांनी केलेला हा प्रकार ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या पुढ्यातच घडला. त्यामुळे तेही या प्रकाराने भांबावलेले होते. शंकरराव व सुनील गडाख घरात नसल्याचे प्रशांत पाटील गडाख यांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी गडाख यांच्या घरातील बेडरूमपर्यंत धाव घेत खात्री केलीच.  त्या पार्श्‍वभुमीवर आज गडाख स्वत:हून अटक होण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाल्याने अटकेच्या कारवाईकडे लक्ष्य लागले आहे. गडाख यांना आज अटक करता येणार नसल्याची भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली. गडाख यांच्यासमवेत त्यांचे वकील देखील आज उपस्थित आहेत. 

''न्यायालयाने माजी आमदार शंकरराव गडाख यांना अटक करुन कालच (ता. 16) न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले होते. तथापि, गडाख यांचा दिवसभर शोध घेतल्यानंतरही ते पोलिस पथकांना सापडले नाहीत. त्याबाबतचा अहवाल पोलिसांतर्फे कालच न्यायालयात देण्यात आलेला आहे. गडाख यांच्या अटकेसाठी आज पोलिसांकडे अटक वॉरंट नाही. त्यामुळे गडाख यांच्या आज अटकेचा प्रश्‍नच नाही. त्याशिवाय काल गडाख यांच्या वकिलांनीच त्यांना पुढील तारखेस न्यायालयात हजर करतो, अशी लेखी हमी दिलेली आहे.''
- दिलीप पवार, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com