सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाजपात दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

विधान परिषदेचे माजी सभापती यांचे ते चिरंजीव आहेत.

कऱ्हाड : सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विधान परिषदेचे माजी सभापती (कै.) शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (सोमवार) भाजपात प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांना भाजपचा मफलर गळ्यात घातला. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, भाजप तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, उदयनराजे भोसले, विक्रम पावसकर आदी उपस्थित होते. देशमुख यांचा पक्ष प्रवेश आज (सोमवार) मुख्यमंत्री फडणवीस यांची कऱ्हाड येथील पत्रकार परिषद झाल्यानंतर झाला.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former president of Sangli Zilla Parishad enters BJP