‘आधीच्या राज्यकर्त्यांनी शहरांकडे दुर्लक्ष केले’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

नगर - स्वातंत्र्यानंतर शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले, त्याला अभिशाप समजून आजवरच्या राज्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे शहरे बकाल झाली. झोपडपट्ट्या तयार झाल्या. घनकचरा, सांडपाण्यासह अनेक प्रश्‍न निर्माण झाले. यासाठी पूर्वी ५ ते ६ हजार कोटींची तरतूद केली जाई, ती आम्ही २४ ते २६ हजार कोटींपर्यंत वाढविली आहे,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

महापालिकेच्या निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित विजय संकल्प सांगता सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘शहरीकरण ही वास्तविकता आहे. मूलभूत सोयींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधींचा निधी दिला आहे. राज्य सरकार शहरीकरणाकडे संधी म्हणून पाहत आहे. प्रत्येकाला स्वतःचे घर देण्याचा त्यांचा संकल्प आहे. चौदावा वित्त आयोग, अमृत व विविध योजनांतून शहर विकासासाठी निधी दिला जात आहे.’’

Web Title: Former rulers ignored the nagar cities says CM