विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले आहे. सांगली जिल्ह्यातील कोकरूड या त्याच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

सांगली- विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले आहे. सांगली जिल्ह्यातील कोकरूड या त्याच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख (वय 84) यांचे निधन झाले. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना त्यांचे सायंकाळी 06 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले.

काही दिवसांपासून ते दीर्घ आजाराने त्रस्‍त होते. सांगलीतल्या शिराळा तालुक्यातील कोकरुड येथे दुपारी 3 च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि वसंतदादा पाटील यांचे कट्टर समर्थक अशी त्याची ओळख होती.

शिवाजीराव देशमुख यांची तीन वेळा बिनविरोध निवड झाली होती. 1978, 1980, 1985 आणि 1990 मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले होते. 2004 आणि 2008 मध्ये विधानपरिषदेच्या सभापतीपदी त्यांची बिनविरोध निवड झाली होती.

Web Title: Former Speaker of Legislative Council Shivajirao Deshmukh passed away