पडक्‍या किल्ल्यांत ‘हेरिटेज हॉटेल’ - जयकुमार रावल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

पोषण आहार निश्‍चित करण्यासाठी समिती  
‘फास्ट फूडमुळे आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी योग्य पोषण आहार निश्‍चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. आहारासंदर्भात अन्न व औषध प्रशासन राज्यभर जनजागृती मोहीम राबविणार आहे,’’ असे रावल यांनी सांगितले.

नगर - पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील ऐतिहासिक; मात्र दुर्लक्षित, पडके किल्ले ‘हेरिटेज हॉटेल’च्या माध्यमातून विकसित केले जाणार आहेत. हे हॉटेल चालविण्यासाठी ‘हेरिटेज’चा अनुभव असणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सिंधुदुर्ग आणि पुण्यात ही संकल्पना राबविली जात आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी दिली.

ते म्हणाले, ‘‘पर्यटन विभागाचे काम ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे आहे. त्याचबरोबर विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रेरित करण्याचे आहे. रायगड जतन करण्याचे काम पर्यटन विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी रायगड प्राधिकरणाची निर्मिती करून ६५० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे.

राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेड राजा मातृतीर्थ म्हणून पर्यटन विभागाकडून विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी १५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fort Heritage Hotel jaykumar rawal