चाळीस व्यापाऱ्यांवर कारवाई होणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - महापालिकेच्या स्थानिक संस्था कराच्या वसुलीसाठी 40 व्यापाऱ्यांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात लवकरच कारवाई केली जाणार असल्याची माहिती स्थानिक संस्था कर अधिकारी सुधाकर चन्नावार यांनी दिली. 40 व्यापाऱ्यांच्या एलबीटीसंदर्भातील असेंसमेंट पूर्ण झाली असून, त्यांना वारंवार नोटिसाही दिल्या आहेत, तरीही हा कर भरला नसल्याने त्यांच्यावर आता जप्तीची कारवाई केली जाणार आहे. 

"ड' वर्ग महापालिकांमधली जकात 1 एप्रिल 2011 पासून रद्द झाली आणि त्याऐवजी स्थानिक संस्था कर लागू झाला. या कराला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध होता. यासाठी व्यापाऱ्यांनी राज्यभर आंदोलन केले. त्यामुळे "ड' वर्ग महापालिकांमधील ही करप्रणालीही बंद करण्याचा निर्णय झाला; पण 2011 ते 2015 या कालावधीत ज्या व्यापाऱ्यांनी एलबीटी भरला. तो कर हा सेल्फ असेंसमेट होता. आता व्यापाऱ्यांनी भरलेला हा कर बरोबर आहे का? याची खात्री करून ज्यांनी कमी कर भरला आहे. त्यांच्याकडून उर्वरित कराची रक्कम वसूल केली जात आहे. त्यासाठी लेखापरीक्षकांची पॅनेलही नेमली आहेत. पहिल्या टप्प्यात असेंसमेट पूर्ण करून कराच्या रकमा निश्‍चित केल्या आहेत. व्यापाऱ्यांचे मत ऐकण्यासाठी सुनावण्याही झाल्या आहेत. त्यानंतर आता कराच्या वसुलीसाठी व्यापाऱ्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 40 व्यापाऱ्यांकडे 60 लाखांची वसुली आहे. त्यांच्याकडून ही रक्कम वसुली करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यांना नोटिसाही पाठविल्या आहेत, तरीही त्यांनी दाद दिली नसल्याने आता एलबीटी वसुलीसाठी जप्तीची कारवाई केली जाणार आहे. 

ज्या व्यापाऱ्यांनी कर भरला आहे. त्यांनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही. असेंसमेट पाहून उर्वरित कागदपत्रे व रक्कम त्यांनी भरायचा आहे. ज्यांनी अजिबात करच भरलेला नाही व कागदपत्रेही सादर केलेली नाहीत, अशांवर मात्र कठोर कारवाई होणार आहे. कोणत्याच प्रक्रियेला दाद दिली नाही, तर एकतर्फी आकारणी करून एलबीटी वसूल केला जाणार आहे. 
-सुधाकर चन्नावार, स्थानिक संस्था कर अधिकारी. 

Web Title: Forty traders will take action on

टॅग्स