कोंबिंग ऑपरेशनमध्ये सापडले देशी बनावटीचे पिस्तूल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

सोलापूर : पत्रा तालीम येथील कार्यकर्ता आबा शिंदे यांच्या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांकडून शहरातील विविध भागांत कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे. देगाव रोडवरील जगताप हॉस्पिटलजवळ थांबलेल्या विजय चंद्रकांत शिंदे (वय 36, रा. मयुरेश्‍वर मंदिराजवळ, आमराई, सोलापूर) यास अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केल्याची माहिती पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली. 

शहरातील सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश पोलिस आयुक्त तांबडे यांनी दिले आहेत. शरीराविषयी, मालाविषयी गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन करण्यात येत आहे. देगाव रोडवर एक व्यक्ती पिस्टल घेऊन थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने धाव घेतली. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता विजय शिंदे असे नाव सांगितले. त्याची अंगझडती घेण्यात आली. त्याच्याकडे सुमारे 50 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले. त्याच्याकडे पिस्टलबाबत परवाना नव्हता. भारतीय हत्यार कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला. 

गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त अभय डोंगरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रणजित माने, पोलिस कर्मचारी नंदराम गायकवाड, दीपक राऊत, विनायक बर्डे, सचिन होटकर, सूरज देशमुख यांनी ही कामगिरी केली. 

आबा कांबळे खून प्रकरणाशी विजय शिंदे याचा संबंध नाही. त्याने आपल्याकडे पिस्टल कोणत्या कारणासाठी बाळगले होते, याची चौकशी चालू आहे. तो पूर्वी फायनान्स कंपनीमध्ये कामाला होता. त्याच्या चौकशीतून अधिक माहिती समोर येईल. 
- महादेव तांबडे, 
पोलिस आयुक्त

Web Title: found pistol in combing operation