तोतया पोलिस बनून फसवणाऱ्या चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

कर्नाटकातील विजापुरच्या कारखान्याला कर्ज देणाऱ्या ठाण्यातील किंग फायनान्स कंपनीचा म्होरक्या दिलीप म्हात्रे याने तीन महिन्यापासुन योजना आखली होती. त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याचा बनाव करुन कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक यांनी कर्जासाठी कमीशन म्हणुन द्यायला आणलेली साडेचार कोटींची रक्कम रक्कम लुटल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

कऱ्हाड - कर्नाटकातील विजापुरच्या कारखान्याला कर्ज देणाऱ्या ठाण्यातील किंग फायनान्स कंपनीचा म्होरक्या दिलीप म्हात्रे याने तीन महिन्यापासुन योजना आखली होती. त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याचा बनाव करुन कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक यांनी कर्जासाठी कमीशन म्हणुन द्यायला आणलेली साडेचार कोटींची रक्कम रक्कम लुटल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

सातारा व रत्नागिरी पोलिसांनी संयुक्तरित्या तपास करुन चार संशयीतांना पकडले आहे. उर्वरीत, चार संशयीत साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली असुन संबंधितांवर मोक्का अंतर्गत कारवाई प्रस्तावीत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

गजानन तदडीकर (वय ४५, रमेशवाडी, बलदापुर पश्चिम कल्याण), विकासकुमार मिश्रा (वय ३०, लल्लुसिंग चाळ, जोगेश्वरी, मुंबई), महेश भांडारकर (वय ५३, वाघबीळ, ठाणेपश्चिम), दिलीप म्हात्रे या संशयीतांना रोख रक्कम ४ कोटी ४८ लाख व गाडीसह ताब्यात घेतले, असुन संबंधित हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. उर्वरीतांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. संबंधितांना मोका लावण्यात येईल, असे पोलिस अधिक्षक श्री. पाटील यांनी सांगितले. 
 

Web Title: four arrested in fraud case