'हॉर्न वाजवला' म्हणून स्कॉर्पिओमधील चौघांनी एसटी चालकाला केली मारहाण

'हॉर्न वाजवला' म्हणून स्कॉर्पिओमधील चौघांनी एसटी चालकाला केली मारहाण

लोणंद : हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून पुणे - सांगोला या एसटी बसला स्कॉर्पिओ आडवी मारून बस अडवून स्कॉर्पिओ मधील अज्ञात चार जणांनी बसच्या चालक व वाहकाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना काल (ता. 8 )  रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास लोणंद -फलटण रस्त्यावर तरडगाव हद्दीत बसस्थानका पासून काही अंतरावर घडली.

दरम्यान एसटी बसमधील 24 ते 25 प्रवाशांना मध्यरात्री ऐन थंडीत कुडकुडत बसून दीड ते दोन तास रखडपट्टी सोसावी लागली. याबाबत लोणंद पोलिस ठाण्यात अज्ञांता विरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती आशी, एसटी महामंडळाच्या सांगोला आगाराचे बसचालक अर्जुन पोपट कवडे (वय 42) हे काल रात्री सांगोला आगाराची स्वारगेट -सांगोला ही एसटी बस क्रमांक (MH40 - Y-5963) घेवून स्वारगेट (पुणे ) येथून जेजुरी, लोणंद,फलटण मार्गे सांगोल्याकडे निघाले होते.

दरम्यान रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एसटी बस तरडगाव नजीक आली असता स्कॉर्पिओ गाडीला ओव्हरटेक करुन पुढे जाताना स्कॉर्पिओ गाडी बसला आडवी मारून एसटी बस आडवली.

स्कॉर्पिओ मधील 30 ते 35 वयाच्या चार जणांनी एसटी बसचे दार उघडून वाहक सोमनाथ ज्ञानेश्वर पवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चालक श्री.कवडे हे बसमधून खाली उतरून धावत पाठीमागे आले. त्यावेळी या चौघांनी शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी तोंडावर व डोळयावर गुद्दे मारून त्यांनाही जखमी केले. त्यानंतर तीन पांढऱ्या व एक लाल रंगाचा शर्ट घातलेले हे चौघे स्कॉर्पिओ क्रमांक (MH12-FU-1225) मध्ये बसून तरडगावच्या दिशेने पळून गेले.

चालकाने प्रवाशांसह बस लोणंद पोलिस ठाण्यात आणली. तेथे दीड ते दोन तास ऐन थंडीत रखडपट्टी सोसल्यावर या बस मधील प्रवाशांना अन्य बसमध्ये बसवून देवून व्यवस्था करण्यात आली.

याबाबत बसचालक अर्जुन पोपट कवडे रा. हतीद, ता. सांगोला, जि. सोलापूर यांनी अज्ञात चौघांविरूध्द लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून लोणंद पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com