विजेच्या धक्क्यांने चार म्हैशींचा मृत्यू

शिवाजी यादव
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - चार म्हैशींना गवत चरण्यासाठी सकाळी मालक घेऊन निघाले होते, अचानक वीजेची तार तुटली मागे राहीलेली म्हैस गत प्राण झाली तशा कांही पावले पुढे गेलेल्या अन्य तीन म्हैशी मागे फिरल्या. पडलेल्या म्हैशाला शिंगाने हालवू लागल्या. दुसरी, तिसरी, चौथी अशा ऐकी सोबत चार म्हैशी जागीच गतप्राण झाल्या

कोल्हापूर - चार म्हैशींना गवत चरण्यासाठी सकाळी मालक घेऊन निघाले होते, अचानक वीजेची तार तुटली मागे राहीलेली म्हैस गत प्राण झाली तशा कांही पावले पुढे गेलेल्या अन्य तीन म्हैशी मागे फिरल्या. पडलेल्या म्हैशाला शिंगाने हालवू लागल्या. दुसरी, तिसरी, चौथी अशा ऐकी सोबत चार म्हैशी जागीच गतप्राण झाल्या, संकटात सापडलेल्या आपल्या सहकारी म्हैशाला सोडविण्याच्या प्रयत्नात चार म्हैशी गतप्राण झाल्या आणि बेडकर व रमनमळा परिसर हेलावला. 

वीजेची प्रवाहीत तार तुटून रमणमळातील बेडेकर मळा परिसरात चार म्हैशी मृत्यूमुखी पडलेल्या म्हैशी अमित भिमराव इंगवले यांच्या असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. त्यांनी सकाळी नेहमी प्रमाणे म्हैशी चरण्यासाठी सोडल्या बेडेकर मळा परिसरातून पलिकडील शेतात या म्हैशी गवत चरण्यासाठी रोज जातात तशा आजही निघाल्या होत्या. दोन म्हैशी पुढे दोन म्हैशी मागे चालत होत्या यातील मागे रहीलेल्या एका म्हैशीवर वीजेची तार अचानकपणे तुटून पडली. म्हैस ओरडली जागीच गतप्राण झाली. पुढे गेलेल्या उरलेल्या म्हैशी इतरत्र हुसकण्यासाठी शेजारून जाणारा एक लहान मुलगा धावला त्याने म्हैशीना अन्यत्र हुसकण्याचा प्रयत्न केला पण आपली सहकारी म्हैस निपचीप पडली म्हणून तिच्याजवळ तिन्ही म्हैशी गेल्या, शिंगे लावून पडलेल्या म्हैशाला हालवून जागे करण्याचा प्रयत्न त्या करू लागल्या यातच त्यांचाही तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला. 
घटनेची माहिती समजताच अवघ्या कांही मिनिटात परिसरातील लोक जमा झाले वीज तार तुटली त्या क्षणी वीज तारेतील प्रवाह खंडीत झाला. कोणीतरी महावितरण कळविले परीसरातील वीज पुरवठा खंडीत केला. 

वाऱ्याच्या झोतामुळे वीज तारा गार्डींग लुपला घासल्या तिथे शॉर्ट सर्किट होऊन तार तुटल्या आणि हा अपघात झाला, विद्युत निरिक्षकांच्या अहवालानुसार नुकसान भरपाई संबधीतांना देण्यात येणार आहे. 

- सुनिल माने,  महावितरण शहर अभियंता 

Web Title: four Buffaloes death due to electric shock