एसटीत सापडला होता गांजा; पती-पत्नीसह चौघांना सक्तमजुरीची शिक्षा

एसटीत सापडला होता गांजा; पती-पत्नीसह चौघांना सक्तमजुरीची शिक्षा

सोलापूर : गांजा जवळ बाळगल्याच्या आरोपावरून पती-पत्नीसह चार जणांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी सुनावली आहे. 

अब्राहम दौलप्पा जन (42, रा. धामरगिड्डी, तेलंगणा), त्याची पत्नी झरीअम्मा अब्राहम जन (वय 34), वसंत बळिराम तेळगुंडे (वय 42, रा. बालाजीनगर, सरोला रोड, जि. लातूर), कुंदन हंबीरराव बोरे (वय 59, रा. ढोरगल्ली, गुरुवार पेठ, सातारा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने आदेशानुसार शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गावर विशेष नाकाबंदी लावण्यात आली होती. 5 फेब्रुवारी 2017 रोजी पोलिसांच्या पथकाकडून नवीन हैदराबाद नाका येथे सर्व वाहनांची तपासणी सुरू होती. 

हेही वाचा : सोलापुरात 'या' रस्त्यांवर वाटते महिलांना भीती!

हैदराबादच्या दिशेने आलेल्या एसटी बस (क्र. एमएच 14 बीटी 4987)ची तपासणी करताना पोलिसांना मागच्या बाजूला सीटखाली ठेवलेल्या पिशवीबाबत संशय आला. पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये गांजा आढळून आला. पोलिसांनी याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील यांना कळविले होते. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींच्या ताब्यातून एक लाख 93 हजार 420 रुपयांचा 19 किलो 335 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री जाधव, बस कंडक्‍टर, पंच, नोडल ऑफिसर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. 

हेही वाचा : ओएलएक्‍सवर बाईकची जाहिरात! वाचा कसा फसला तरुण..

आरोपींच्या ताब्यात विनापरवाना गांजा मिळून आल्याने न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी हे गुन्हा दाखल झाल्यापासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची जवळपास अडीच वर्षांची शिक्षा भोगून झाली असून त्यांना सेट ऑफ देण्यात आला आहे. यात सरकारतर्फे ऍड. प्रकाश जन्नू यांनी तर आरोपीतर्फे ऍड. यू. डी. जहागीरदार, ऍड. आर. बी. बायस यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com