देशातील बँका चार दिवस बंद; पाच लाख कामगार संपावर

नवीन कामगार कायदा, खासगीकरण आदी न्याय्य मागण्यांसाठी देशातील कामगार २८ व २९ मार्चला संपावर जात आहेत.
Bank
BankSakal
Summary

नवीन कामगार कायदा, खासगीकरण आदी न्याय्य मागण्यांसाठी देशातील कामगार २८ व २९ मार्चला संपावर जात आहेत.

सांगली - नवीन कामगार कायदा, खासगीकरण आदी न्याय्य मागण्यांसाठी देशातील कामगार (Worker) २८ व २९ मार्चला संपावर (Strike) जात आहेत. संपात सुमारे पाच लाखांहून अधिक बॅंक कर्मचारी, (Bank Employee) अधिकारी (Officers) सहभागी होत आहेत. त्यामुळे या दोन दिवशी बँका बंद (Bank Close) असतील. शिवाय २६ व २७ मार्चला शनिवारी व रविवार असल्याने सुटी आहे. त्यामुळे बँका चार दिवस बंद राहणार असून त्याआधीच दोन दिवसात २५ मार्चपर्यंत सर्व आर्थिक कामे करून घेणे गरजेचे आहे.

चालू आर्थिक वर्षांचे काही दिवसच आता शिल्लक राहिले आहेत. एप्रिलच्या पहिल्या तारखेपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरूवात होते. नवीन आर्थिक वर्षांआधीच जुनी सर्व कामे आवरून घेतली जातात. पण कामगारांचा संप २८ व २९ मार्चला आहे. त्यातच शनीवार, रविवारी सुट्टी आल्याने शुक्रवारी (ता. २५) पर्यंतच सर्व आर्थिक व बँकांशी निगडित कामे करावी लागणार आहे.

नवीन कामगार कायदे, सरकार सरसकट सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे जे खासगीकरण, सरसकट आऊटसोर्सिंगला विरोध, कंत्राटी पद्धतीचा अवलंब करून कामगारांचे शोषण, नवीन कर्मचाऱ्यना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी हा आग्रह देखील संघटनांचा आहे. संपात बँक कर्मचारी तसेच अधिकारी वर्गाची कुठलीच आर्थिक मागणी अंतर्भूत नाही तर देशातील सामान्य माणसाची शंभर लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तीची बचत सुरक्षित राहावी, यासाठी बँकिंग सार्वजनिक क्षेत्रात राहावे म्हणून बँक कर्मचारी हा संप करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com