विशाल कोतकरसह खोल्लमला चार दिवसांची पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

नगर : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी खूनप्रकरणात आज पहाटे कामरगाव (ता. नगर) शिवारात अटक केलेल्या विशाल कोतकर याच्यासह रवी खोल्लम यास चार दिवसांच्या (ता. 27) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

महानगरपालिका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर त्याच दिवशी संध्याकाळी केडगाव येथील सुवर्णानगर परिसरात शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ता वसंत ठुबे यांची गोळ्या घालून व त्यानंतर गळे चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यातील विशाल कोतकर यांच्या अटकेसाठी पोलिसांनी कसून प्रयत्न केल्याने आज पहाटे तो पोलिसांच्या हाती लागला.  

Web Title: four days police custody to vishal kotkar and khollam