धक्‍कादायक ! 21 वर्षीय महिलेसह चौघांचा मृत्यू; शहरात 20 पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे
Friday, 17 July 2020

ठळक बाबी... 

  • शहरात आज (शुक्रवारी) सापडले नवे 20 रुग्ण; चौघांचा मृत्यू 
  • शहरातील एकूण रुग्णसंख्या तीन हजार 557 तर मृतांची संख्या 318 झाली 
  • रुग्णांच्या संपर्कातील 59 संशयितांचे अहवाल पेन्डिंग; दहा दिवसांत 20 हजार ऍन्टीजेन टेस्टचे नियोजन 
  • प्रतिबंधित क्षेत्रातील ऍन्टीजेन टेस्टसाठी 15 पथके; शुक्रवारी 306 जणांची ऍन्टीजेन टेस्ट 
  • होम क्‍वारंटाईनमध्ये एक हजार 864 व्यक्‍ती तर संस्थात्मक विलगीकरणात अवघे 85 व्यक्‍ती 

सोलापूर : शहरात शुक्रवारी (ता. 17) 20 नव्या रुग्णांची भर पडली असून रॅपिड ऍन्टीजेन टेस्टमध्ये 306 अहवालांपैकी 11 रुग्ण सापडले. तर उर्वरित टेस्टमध्ये नऊ रुग्ण आढळले. दुसरीकडे चारजणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 21 वर्षीय महिलेसह 87 वर्षीय महिला आणि 60 वर्षांवरील दोन पुरुषांचा समावेश आहे. आता मृतांची संख्या 318 झाली असून एकूण रुग्णांची संख्या तीन हजार 557 झाली आहे. 

'या' ठिकाणी सापडले नवे रुग्ण 
गंगाधर हौसिंग सोसायटी, नवोदय कॉम्प्लेक्‍स (होटगी रोड), म्हाडा कॉलनी, गोविंदश्री मंगल कार्यालयाजवळ (जुळे सोलापूर), कमला नगर, हरळय्या नगर, रामलिंग सोसायटी (वियजपूर रोड), साई विहार (कुमठा नाका), आकाश नगर, सरस्वती नगर (शेळगी), जुळे सोलापूर, स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), ओम सोसायटी, नंदकुमार राम मंदिराजवळ (दक्षिण कसबा), दमाणी नगर, मड्डी वस्ती (कुमठे) आणि मंजुनाथ नगर (लिमयेवाडी) याठिकाणी शुक्रवारी (ता. 17) नवे 20 रुग्ण सापडले आहेत. दुसरीकडे अक्‍कलकोट रोडवरील कोंडा नगरातील 65 वर्षीय पुरुष, रमाबाई आंबेडकर नगरातील 60 वर्षीय पुरुषाचा आणि होटगी रोडवरील संत गुलाबबाबा नगरातील 87 वर्षीय महिलेचा तर नई जिंदगी परिसरातील विजयालक्ष्मी नगरातील 21 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

ठळक बाबी... 

  • शहरात आज (शुक्रवारी) सापडले नवे 20 रुग्ण; चौघांचा मृत्यू 
  • शहरातील एकूण रुग्णसंख्या तीन हजार 557 तर मृतांची संख्या 318 झाली 
  • रुग्णांच्या संपर्कातील 59 संशयितांचे अहवाल पेन्डिंग; दहा दिवसांत 20 हजार ऍन्टीजेन टेस्टचे नियोजन 
  • प्रतिबंधित क्षेत्रातील ऍन्टीजेन टेस्टसाठी 15 पथके; शुक्रवारी 306 जणांची ऍन्टीजेन टेस्ट 
  • होम क्‍वारंटाईनमध्ये एक हजार 864 व्यक्‍ती तर संस्थात्मक विलगीकरणात अवघे 85 व्यक्‍ती 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four died, including a 21-year-old woman; 20 positives in the city