चंदगड तालुक्यात जंगमहट्टी धनगरवाड्यावर चार हत्तींकडून नुकसान 

जंगमहट्टी धनगरवाडा - पाणवठ्यावर उमटलेल्या हत्तीच्या पाऊलखुणा. 
जंगमहट्टी धनगरवाडा - पाणवठ्यावर उमटलेल्या हत्तीच्या पाऊलखुणा. 

चंदगड - जंगमहट्टी (ता. चंदगड) धनगरवाड्यावर दोन मोठे आणि दोन लहान हत्तींचा वावर असून काल रात्री त्यांनी काही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले. ऐन सुगीच्या हंगामातच हत्तींचा कळप इथे दाखल झाल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. धनगरवाड्यावरील पाणवठ्यावरही हत्तींच्या पाऊलखुणा उमटल्या असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

काल रात्री अर्जून गावडे व तानाजी गावडे यांच्या शेतात या हत्तींनी धुडगूस घातला. नाचण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. गेल्या काही वर्षापासून सुगीच्या हंगामातच हत्तीचे कळप दाखल होतात. हाताशी आलेले पिक हत्तीकडून उध्वस्त केले जाते. गवे आणि रानडुक्करांपासून रात्रीची रखवाली करुन राखलेले पिक हत्तींकडून फस्त केले जात असताना ते पहात बसण्याखेरीज शेतकऱ्यांपुढे पर्याय उरत नाही. हेरे परिसरात हत्तीचा बारमाही वावर आहे. 

जंगलालगतची शेती कसणे बंद 
अन्य प्राण्यांपेक्षा हत्तीकडून होणारे नुकसान मोठे असून ते शेतकऱ्याला उध्वस्त करणारे आहे. हत्तीच्या भितीने काही शेतकऱ्यांनी जंगलालगतची शेती कसणे सोडून दिले आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा प्रश्‍न असून वन विभाग आणि प्रशासनाने त्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com