खिद्रापुरेसह चौघे न्यायालयीन कोठडीत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

मिरज - राज्याला हादरवून सोडलेल्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्याप्रकरणी पोलिस खोलवर तपास करत आहेत. पोलिस तपासात सात जोडप्यांची नावे स्पष्ट झाली आहेत. त्यांनी भ्रूणहत्या केली की गर्भलिंगनिदान केले, याची माहिती गोपनीय ठेवली आहे. मात्र त्यांच्या डीएनए चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे हे नमुने पाठवले जातील. त्याच्या अहवालानंतर बरीच धक्कादायक माहिती उजेडात येईल. 

दरम्यान, भ्रूण हत्याकांडात अटकेत असलेल्या चौघांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. गर्भपातावेळी मृत झालेल्या स्वाती जमदाडेचा पती प्रवीण पतंगराव जमदाडे, क्रूरकर्मा डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे, एजंट सातगोंडा ऊर्फ संभा कलगोंडा पाटील (वय 62, रा. कागवाड) आणि यासिन हुसेन तहसीलदार (वय 60, रा. तेरवाड) यांचा समावेश आहे. दरम्यान गर्भपाताच्या गोळ्या पुरवणाऱ्या रॅकेटमधील मुंबईचा औषध प्रतिनिधी दत्तात्रय गेनू भोसले (वय 30) याला न्यायालयाने 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणातील मुख्य संशयितांवर न्यायालयात हल्ला होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने आज मिरज न्यायालयात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात होता. 

भ्रूणहत्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चौदा जणांना अटक केली आहे. यापैकी प्रवीण जमदाडे, डॉ. खिद्रापुरे, सातगोंडा पाटील, यासिन तहसीलदार या चौघांची पोलिस कोठडी संपली. त्यांना बंदोबस्तात न्यायालयात आणले. चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश न्यायदंडाधिकारी यांनी दिला, तर मुंबईतील उल्हासनगरमधून अटक केलेला दत्ता भोसले हा एका खासगी औषध विक्रेत्याकडील प्रतिनिधी आहे. 

दरम्यान, अटकेतील कागवाडच्या डॉ. श्रीहरी घोडके याने साडेतीनशेहून अधिक गर्भलिंग तपासण्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील अनेक गावांमध्ये किती महिलांचे गर्भपात झाले? यामध्ये एजंटाचे जाळे कोठे पसरले आहे? याचा तपास पोलिस यंत्रणा गांभीर्याने करते आहे. आज सात जोडप्यांना पोलिसांनी बोलवून डीएनए चाचणीसाठी रक्ताचे नमुने घेतले आहेत. 

Web Title: Four with khidrapure judicial custody